BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ नोव्हें, २०२३

स्वत:साठी त्यांनी खोदला खड्डा आणि ----




शोध न्यूज : मराठा आरक्षण मागणीसाठी एका समाज सेवकाने चक्क जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घोषित केला आणि स्वत:साठी खड्डाही खोडून घेतला पण, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झाल्याने, सुदैवाने पुढील घटना टळली गेली.


मराठा आरक्षण मिळावे, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे म्हणून, आंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरु केले होते. पहिल्या टप्प्यात जरांगे पाटील उपोषणाला बसले तेंव्हा, शासनाकडून त्यांची फसवणूक झाली. मागणी केल्यापेक्षा अधिक मुदत देऊनही शासनाने मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय न घेतल्यामुळे जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले . त्यानंतर मात्र त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड पाठींबा मिळाला. दरम्यान  राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाताना दिसत होती, मंत्री,आमदार, खासदार, राजकीय नेते यांना गावबंदी करण्यात आल्याने, नेतेमंडळीचे अवघड होऊन बसले होते तर सरकार मोठ्या पेचात अडकले होते. या दरम्यानच्या काळात अनेक तरुणांनी, मराठा आरक्षणाची मागणी करीत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. यामुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आणि सरकारवर असलेल्या रागाची तीव्रता आणखीच वाढीला लागली.


या आंदोलनात समाजातील सर्व घटकांचा पाठींबा लाभला त्यामुळे जाती जातीत भांडण लावण्याचा डाव उधळला गेला. वेगवेगळ्या प्रकारे पाठींबा मिळत असताना, सरकार मात्र सकारात्मक भूमिका घेताना दिसत नव्हते त्यामुळे, धाराशिव जिल्ह्यातील समासेवक विनायकराव पाटील यांनी कवठा येथे जिवंत समाधी घेण्याचा निर्णय जाहीर केला. आज शुक्रवारी, ३ नोव्हेंबर रोजी ते जिवंत समाधी आंदोलन घेणार होते. तशी माहिती त्यांनी आधीच पत्रकार परिषदेत दिली होती.मराठा आरक्षण देण्याबाबत सरकार सकारात्मक नाही आणि उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावत चालल्यामुळे त्यांनी आपला हा निर्णय घोषित केला होता. आपल्या निर्णयावर तेठाम राहिले होते आणि जिवंत समाधी घेण्याची संपूर्ण तयारी देखील करण्यात आली होती.    उपोषण स्थळा पासून मैदानात ५ x ८ आकाराचा खड्डा जेसीबीच्या सह्याने खोदण्यात आला होता  समाधी अंदोलनासाठी परिसरातील २५ गावातील भजनी मंडळ, दिंड्या जीवंत समाधी अंदोलनात सहभागी होण्याचे नियोजन करण्यात आले होते.


जिवंत समाधी आंदोलन आज शुक्रवारी होणार असतानाच, आदल्या दिवशी सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले, (A Living Tomb for Maratha Reservation) शासनाला काही मुदत देत त्यांनी आपले उपोषण सोडले, त्यांच्या उपोषणामुळे जिवंत समाधी घेण्याची वेळ, समाजसेवक विनायकराव पाटील यांच्यावर आली नाही. त्याच बरोबर राज्यभरात सुरु असलेले मराठा समाजाचे साखळी उपोषण देखील स्थगित करण्यात आले आहेत. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !