BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० नोव्हें, २०२३

सोलापूर जिल्ह्यात आणखी चाळीस मंडळात दुष्काळ जाहीर पण --



शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील आणखी  चाळीस मंडळात दुष्काळ जाहीर करण्यास मंत्रीमंडळ उप समिती बैठकीत मान्यता मिळाली आहे पण मंगळवेढा, उत्तर सोलापूर, मोहोळ तालुक्यांना मात्र  फटकाच देण्यात आला आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माढा, करमाळा, माळशिरस, बार्शी या तालुक्यात आधीच  दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. यावर्षी झालेला पाऊस, पाणी पातळी, पावसाचा खंड आणि हिरवळ तसेच प्रकल्पातील पाणी साठा यांच्या आधारे हा दुष्काळ जाहीर केला गेला पण, हा सर्व्हे सॅटेलाईटद्वारे ऑनलाइन करण्यात आला. या सर्व्हेनुसारच या तालुक्यातील दुष्काळाची घोषणा करण्यात आली आहे. ज्या महसुली मंडळात सरासरीच्या तुलनेत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पावसाची नोंद झाली अशा तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी मंत्री मंडळ उप समितीने मान्यता दिली त्यानुसार  यात सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर या सहा तालुक्यांमधील ४० महसूल मंडलांचा समावेश आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यातील उर्वरित भाग मात्र तसाच राहिला आहे.


ट्रिगर २ मध्ये समावेश झालेले पाच तालुकेच पात्र ठरले त्यामुळे जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी केवळ पाच  तालुक्यांना लाभ मिळाला. अक्कलकोट आणि उतर सोलापूर सोडले तर बाकीचे चार तालुके हे ट्रिगर १ मध्ये होते. राहिलेल्या सहा तालुक्यांचे अहवाल जिल्हा  प्रशासनाने मागवून घेतले तसेच कृषी विभागाकडून अधिक माहिती मिळवत त्याचा अहवाल सरकार दरबारी सादर करण्याची तयारीही करण्यात आली होती. पण केवळ पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला. वास्तविक पहाता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि हे वास्तव उघड्या डोळ्यांनी दिसत आहे. सरकारी यंत्रणेला मात्र हा दुष्काळ दिसत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्यातून होत असताना, सोलापूर जिल्ह्यातून देखील ती झाली आणि मंत्रीमंडळ उप समितीने महत्वाचे निर्णय घेतले.


पंढरपूर तालुक्यातील  भाळवणी, भंडीशेगाव, तुंगत, पुळूज पटवर्धन कुरोली, करकंब, कासेगाव,  मोहोळ तालुक्यातील कामती आणि वाघोली, उत्तर सोलापुर तालुक्यातील तिऱ्हे, अक्कलकोट तालुक्यातील किणी, जेऊर, तडवळ, करजगी, दुधनी, मैंदर्गी,  दक्षिण सोलापुरातील मंद्रूप, होटगी, निंबर्गी, विंचूर यांच्यासह जिल्ह्यातील ४० महसूल मंडळात ७५ टक्क्यापेक्षा कमी पावसाची  नोंद झालेली होती. (Drought declared in more circles in Solapur district) सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर,अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मंगळवेढा,  व मोहोळ या सहा तालुक्यांमधील ४० महसूल मंडलांचा दुष्काळात समावेश झाला असल्याची माहिती मिळत असली तरी त्यात नेमका कोणत्या मंडळांचा  समावेश आहे हे पाहिल्यानंतर उरलेल्या मंडळासाठी प्रस्ताव सादर करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !