BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ नोव्हें, २०२३

सरपंचांसह पूर्ण ग्रामपंचायतीचा राजीनामा ! मराठा आरक्षणाची मागणी !!


शोध न्यूज : मराठा आरक्षणासाठी आम्दारापासून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच यांच्यापर्यंत राजीनामासत्र सुरु झाले असून, मराठा अभिमान असलेले पदाधिकारी पदावर लाथ मारून सरकारचा निषेध करू लागले आहेत. पंढरपूर तालुक्यात देखील अनेक राजीनामे झालेले असताना, एका ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्य आणि सरपंचानीही राजीनामा देवून मराठा स्वाभिमान जपला आहे.


मराठा आरक्षण हा सद्याचा ज्वलंत विषय बनला आहे आणि महाराष्ट्रातील मराठा एकवटला आहे. मराठा योद्ध मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषणाला राज्यभरातून पाठींबा मिळत असून, अनेक लोकप्रतिनिधी तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील राजीनामा देवून, मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा व्यक्त करीत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आपला जीव मराठ्यांच्या पुढच्या पिढीच्या भल्यासाठी डावावर लावला आहे. मराठा समाज पेटून उठला  आहे. सरकार आणि त्यांच्या पक्षाचे काही पदाधिकारी मात्र अजूनही समाजाची दिशाभूल करीत आहेत, मराठा समाजाच्या भावनेपेक्षा त्यांना आपली पदे महत्वाची वाटत आहेत. अर्थात त्यांना याची किंमत चुकवावी लागणार असून, समाजाच्या भावनेपेक्षा पक्ष आणि ग्रामपंचायतीची पदे त्यांच्यासाठी महत्वाची ठरत आहेत. मराठा समाज याची नोंद घेत असतानाच अनेक ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्य आपले राजीनामे स्वाभिमानाने फेकून देवू लागले आहेत. त्यातच पंढरपूर तालुक्यातील जाधववाडी येथील सरपंच आणि सदस्य यांनी स्वाभिमान दाखवला आहे.


पंढरपूर तालुक्यातील जाधववाडी येथील ग्रामपंचायतीच्या सर्वच सदस्यांनी, मराठा समाजासाठी आपली पदे सरकारच्या तोंडावर भिरकावून दिली आहेत. जाधववाडी ग्राम पंच्यातीचे सरपंच सौ. मीरा पोपट शेंडे यांनी आपल्या सरपंचपदाचा राजीनामा, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींबा व्यक्त करण्यासाठी दिला आहे. तत्पूर्वी सदर ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. मराठा आरक्षण देण्यात शासन करीत असलेल्या हलागार्जीचा निषेध आणि मराठा आरक्षण मागणीला पाठींबा म्हुणुन हे राजीनामे देण्यात आले आहेत. सदस्यांचे राजीनामे सरपंच यांचेकडे देण्यात आले होते तर सरपंच यांचा राजीनामा गट विकास अधिकारी यांच्याकडे देण्यात आला आहे. अशी माहिती देण्यात आली. 


मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून हे राजीनामे देण्यात आले असून, शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिले जावे  अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे. (Resignation of Gram Panchayat including Sarpanchs) यावेळी 'एक  मराठा लाख मराठा,' आरक्षण आमच्या हक्काचे,  नाही कुणाच्या बापाचे' अशा विविध घोषणा देण्यात आल्या. या ग्रामपंचायतीचा आदर्श घेवून, पंढरपूर तालुक्यातील किती सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य, मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहतात हे येत्या काळात दिसणार आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !