BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० ऑक्टो, २०२३

आरक्षण नको, समान नागरी कायदा करा !

 




शोध न्यूज :आरक्षणच नको, समान नागरी कायदा करा अशी मागणीच आता ग्रामीण भागातून पुढे आली असून, पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथे ग्रामस्थांनी उपोषण सुरु केले आहे. पंढरपूर तालुक्यातील पन्नास पेक्षा अधिक गावातून आता आंदोलन  सुरु झाले आहे.  


पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथून नवी मागणी समोर आली आहे. गाव पातळीवर संतापाच्या ठिणग्या उडू लगल्या आहेत.  गावोगावचा मराठा बांधव एकवटला असून .शिंदे फडणवीस सरकारचा जोरदार निषेध केला जात आहे. पन्नास खोके घेता, मग आरक्षणासाठी का थांबता ? आमदार खासदार राजीनामा का देत नाहीत ? असा सवाल गावकरी विचारू लागले आहेत. एक तर मराठा आरक्षण द्या, नाहीतर सगळेच आरक्षण रद्द करा ! अशी मागणी पुढे येताना दिसत आहे. 


गेल्या चाळीस वर्षापासून मराठा आरक्षण मिळावे म्हणून मराठा बांधव लढा देत आहेत, मराठ्यांच्या पिढ्यानपिढ्या बरबाद होऊ लागल्या आहेत. सरकार मात्र पक्ष फोडाफोडीत व्यस्त असून, ज्याला त्याला खुर्ची सांभाळण्याची काळजी लागली आहे. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र अस्वस्थ आहे. मराठा तरुण  आयुष्याचा शेवट करीत आहेत, मनोज जरांगे पाटील यांनी, समाजासाठी आपला जीव डावावर लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील गावागावात आक्रोश सुरु झाला आहे. पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली गावही एकवटले आहे.  


मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा  देण्यासाठी फुल चिंचोली ग्रामस्थांनी देखील उपोषण सुरु केले आहे. (No reservation, make equal civil law) गावातील सगळ्या समाजाच्या पाठींबा या आंदोलनाला मिळाला आहे. मराठा आरक्षण द्या, देत नसाल तर सगळेच आरक्षण रद्द करा, समान नागरी कायदा लागू करा अशी मागणीच येथे करण्यात आली आहे.   













कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !