BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ ऑक्टो, २०२३

प्रसिध्द कीर्तनकार बाबामहाराज सातारकर याचं निधन

 




शोध न्यूज : महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांनी वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या लाखो अनुयायांना मोठा धक्का बसला आहे.


ह. भ. प. बाबामहाराज  सातारकर हे  केवळ महाराष्ट्रापुरते नव्हते तर, जगभरात त्यांचा लौकिक होता. जेष्ठ कीर्तनकार म्हणून त्यांचा परिचय होता. महाराष्ट्रात खेडोपाडी त्यांचे अनुयायी होते तर त्यांचे कीर्तन वेगवेगळ्या माध्यमातून गावागावात ऐकले जात होते. त्यांचे आज निधन झाले असून यामुळे वारकरी, भाविक यांना देखील एक मोठा धक्का बसला आहे. त्यांचे निधन झाले असून गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती साथ देत नव्हती. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय शोकमग्न झाला आहे. ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारा येथे त्यांचा जन्म झाला आहे. वारकरी सांप्रदायाची  परंपरा असलेल्या घरात बाबा महाराज जन्माला आले, घराण्याची शेकडो वर्षांची परंपरा बाबा महाराज यांनी पुढे सुरु ठेवली आणि वाढवलीही.


वयामुळे बाबामहाराज सातारकर यांना कीर्तनासाठी उभे  राहणे अशक्य होऊ लगले त्यामुळे, त्यांचा नातू ही परंप पुढे घेवून निघाला आहे. बाबा महाराजांच्या निधनाने महाराष्ट्र हळहळला असून आज दुपारी तीन  वाजल्यापासून त्यांचे पार्थिव, (Babamaharaj Satarakar no more )नेरूळ जिमखाना समोर असलेल्या विठ्ठल मंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून उद्या शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता नेरूळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.  पंढरपूर येथे त्यांच्या निधनाची बातमी आली तेंव्हा अनेकांनी शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !