BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ ऑक्टो, २०२३

खा. उदयनराजे यांच्या राजकीय संन्यासाचे संकेत !


शोध न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि सातारा येथील राज्य सभेचे खासदार उदयनराजे यांनी यापुढे निवडणूक न लढविण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी स्वत:च पत्रकार  परिषदेत याबाबत भाष्य केले आहे.


शासकीय नोकरी करण्यासाठी वयाची मर्यादा असते तशी राजकारणात नसते. साठी ओलांडली तरी निवडणूक लढता येते आणि देशाचा, राज्याचा कारभार करता येतो. याबाबत अनेकदा टीकाही होत असते. निवृत्ती घेण्याच्या वयात काही नेते निवडणुकीला उभे राहिलेले असतात त्यामुळे जनतेतून देखील त्यांना निवृत्त होण्याचा सल्ला दिला जातो. गेल्या काही महिन्यांपासून तर शरद पवार यांच्याबाबत अशी विधाने येत आहेत. विशेषत: शरद पवार यांच्या संदर्भात बोलताना अजित पवार यांनी देखील असाच सूर लावलेला होता. (A sign of Udayanaraje's political retirement) आता मात्र राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी स्वत:बाबतच काही संकेत अत्यंत स्पष्टपणे दिले आहेत. त्यामुळे यापुढे ते कोणतीच निवडणूक लढणार नाहीत असे दिसत आहे. 


'निवडणूक लढविण्याची आपली खाज आता भागली आहे, पाहता पाहता वयाची पन्नास वर्षे कधी ओलांडली हे देखील समजले नाही. राजकारणात रिटायरमेंट घेण्याचे देखील एक वय असले पाहिजे'  असे खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शिवाय त्यांनी शरद पवार यानाही सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी देखील आता मार्गदर्शकाची भूमिका बजावण्याची आवश्यकता असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. शासकीय नोकरीत जसे निवृत्तीचे वय निश्चित असते तसेच राजकारणात देखील असायला हवे, हाच नियम राजकारणी मंडळीनाही लागू असायला हवा. लोकांचा आग्रह आहे म्हणून आपण निवडणूक लढवत असल्याचे सांगितले जाते पण, हे कुठे तरी थांबायला हवे. शरद पवार यांनी मुख्यमंत्री पद भोगले आहे, केंद्रातील अनेक पदे उपभोगली आहेत त्यामुळे आता त्यांनी मार्गदर्शक याच भूमिकेत असायला हवे असे राज ठाकरे यांनी देखील म्हटलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !