BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ ऑक्टो, २०२३

-- आणि पोलिसांना सापडलेच नाहीत इंदुरीकर महाराज !




शोध न्यूज : प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या शोधासाठी गेलेल्या पोलिसांना महाराज सापडलेच नाहीत आणि पोलीस आपले काम न करताच रित्या हाती परत आले. 


महाराष्ट्रात निवृत्तीमाहाराज इंदुरीकर यांचे मोठे नाव आहे. खास शैलीतील त्यांचे कीर्तन महाराष्ट्रातील प्रत्येकाला आवडतेच शिवाय यु ट्यूबवरून देखील अनेक चाहते त्यांचे कीर्तन ऐकत असतात. दररोज त्यांचे कीर्तन राज्यात कुठे ना कुठे असते, त्यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचीही जाहिरात मोठ्या प्रमाणात होत असते त्यामुळे आज महाराज कुठे आहेत याची माहिती अनेकांना असते. पोलिसांना मात्र त्याबाबत माहिती नसल्यामुळे त्यांना इंदुरीकर महाराज यांच्यापर्यंत पोहोचता आले नसावे असे दिसते. अखेर न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांना पुढची तारीख दिली असून आता पुढच्या तारखेला तरी काय होतेय हे पाहावे लागणार आहे. 


इंदुरीकर महाराज अत्यंत स्पष्ट आणि परखड परंतु सत्य मत जाहीरपणे मांडतात, पण  हेच  त्यांच्या अंगाशी येताना दिसते. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे कायद्याचा ससेमिरा त्यांच्या मागे लागत असतो. असेच  एक प्रकरण त्यांचा पिच्छा पुरवत असून, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पुन्हा खालच्या न्यायालयात पोहोचले आहे. वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात २०२० साली पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव अँड.रंजना गवांदे यांनी देशमुख यांच्या विरोधात संगमनेर येथील न्यायालयात तक्रार केली होती. कथित वादग्रस्त विधान केल्याचे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले परंतु तेथून ते पुन्हा संगमनेर येथील न्यायालयात पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी न्यायालयाने निवृत्तीमहाराज यांना समन्स पाठवले होते पण नियोजित तारखेला महाराज न्यायालयात हजर झाले नाहीत.  इंदुरीकर महाराज समन्स बजावणीसाठी पोलिसांना भेटले नसल्याने न्यायालयात हजर राहण्यासाठी त्यांना पुढील तारीख देण्यात आली आहे.


इंदुरीकर महाराज यांना आता या नव्या तारखेला न्यायालयात उपस्थित राहून जामीन द्यावा लागणार आहे. त्यामुळे त्यांना न्यायालयात उपस्थित राहणे क्रमप्राप्त आहे असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. शिवाय इंदुरीकर महाराज यांना उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत समन्स बजावण्यात यावे अशी मागणी आपण न्यायालयात करणार आहोत असे देखील त्यांनी सांगितले आहे. (Police have not found Indurikar Maharaj) न्यायालयात ते हजर नाही राहिले तर त्यांच्या विरोधात वॉरंट निघू शकतो याचिकाकर्त्या अँड. गवांदे यांनी सांगितले. त्यामुळे आता पुढच्या तारखेला काय होतेय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !