मोबाईल फोन हा प्रत्येकाच्या आयुष्याचाच महत्वाचा भाग बनला असून, लहान मुलांनाही मोबाईलचे मोठे वेड आहे. केवळ मोबाईल दिला नाही म्हणून, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील, एका पंधरा वर्षे वयाच्या मुलीने थेट सातव्या मजल्यावरून उडी घेतली आणि आपल्या आयुष्याचा शेवट केला. काळजाला पीळ पाडणारी ही घटना पुणे जिल्ह्यातील देहू येथे घडली आहे.
मोबाईलच्या अति वापरामुळे लहान मुलांचे डोळे खराब होत आहेत, त्यामुळे लहान मुलांच्या मोबाईल खेळण्यावर निर्बंध आवश्यक आहेत. अनेक पालक आपल्या लहान मुलांना मोबाईल देवून शांत करतात पण धोक्याचे आहे. काही पालक मुलांना मोबाईलपासून दूर ठेवतात. परंतु मोबाईल मिळत नाही म्हणून लहान मुले नको ते करतात. आजवर अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. आता पुन्हा आर्या गणेश सावंत या, दहावीत शिकणाऱ्या मुलीने टोकाचे पाउल उचलले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील गणेश सावंत आणि त्यांच्या पत्नी हे दोघेही दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. कामानिमित्त ते देहू येथील अभिलाषा हाउसिंग सोसायटीत राहतात. त्यांची मुलगी आर्या ही दहावीत शिक्षण घेत होती. घटनेच्या आधी आर्याने आपल्या आईकडे मोबाईलची मागणी केली. आई वडिलांनी मोबाईल देण्यास नकार दिला. (Girl commits suicide for not giving mobile phone) यामुळे नाराज झालेल्या आर्याने थेट सातव्या मजल्यावरून खाली उडी घेतली.. तिला तातडीने रुग्णालयात दाखल देखील करण्यात आले पण काही उपयोग झाला नाही. सावंत कुटुंबाला हा मोठा धक्का बसला असून अन्य पालक देखील चिंतेत आले आहेत. मोबाईल हा जीवनापेक्षाही मोठा नाही पण ---
चिंताजनक !
मोबाईल दिला नाही म्हणून,अशा प्रकारे एका जीवाचा शेवट झाला असून, या आधीही काही जीव अशाच रागात अथवा नाराजीत गेले आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी पालकांनी अखंड प्रयत्नशील राहण्याची आवश्यकता असून मुलांना प्रेमाने मोबाईल प्रेमापासून दूर नेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !