BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ ऑक्टो, २०२३

लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सरपंचपदी संजय साठे यांची निवड !

 




शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत सरपंचपदी शिवसेनेचे (शिंदे गट) संजय साठे यांची तर उपसरपंच पदावर परिचारक गटाचे महादेव पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर साठे आणि पवार समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला.


एकूण सतरा सदस्य संख्येच्या टाकळी ग्राम पंचायतीत   पंचवार्षिक निवडणुकीत परिचारक गटाचे नेते जिल्हा परिषद रामदास ढोणे यांच्या गटाचे ७तर महेशनाना साठे यांच्या गटाचे ४सदस्य तर विरोधी गटाला उर्वरित जागा मिळाल्या होत्या. यामध्ये भाजप आणि सेना अशी युती करीत सुरुवातीला भाजपला सरपंच आणि सेनेला उपसरपंच पद दिले होते. आता संजय साठे यांना या सरपंच पदाचा मान मिळाला आहे.    या निवडीचे वेळी मावळत्या सरपंच विजयमाला वाळके, सौ नागरबाई साठे, सौ आशाबाई देवकते, औदुंबर ढोणे,नंदकुमार वाघमारे, सौ रेश्मा साठे, सौ रोहिणी साठे, सौ रुपाली कारंडे, सागर सोनवणे, हे सदस्य उपस्थित होते. सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड होताच जल्लोष साजरा करून सत्कार करण्यात आले.यावेळी रामदास ढोणे, महेशनाना साठे, सचिन वाळके, यांच्यासह परिचारक गट आणि साठे गटाचे अनेक समर्थक उपस्थित होते.


लक्ष्मी टाकळी गावाच्या विकासासाठी आपण शक्य तेवढे सगळे प्रयत्न करू, पंचवार्षिक निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू असे यावेळी नूतन सरपंच संजय साठे यांनी सांगितले. फुलांच्या पाकळ्या आणि गुलालाची उधळण करीत समर्थकांनी या निवडीचे स्वागत केले असून जल्लोष देखील केला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !