पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाचा खून केल्याही एक धक्कादायक घटना समोर आली असून पंढरपूर तालुका पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पंढरपूर तालुक्यात आज सकाळीच एक घटना उघडकीस आली, परिसरात सुटलेल्या दुर्गंधीने या घटनेला समोर आणले आहे आणि त्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पंढरपूर तालुक्यातून एक मोठी घटना समोर आली असून, एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. मृतदेहाची अवस्था आणि एकूण परिस्थिती पाहता, हा खून असल्याचेच दिसून येत आहे, आज गुरुवारी सकाळी, पंढरपूर लगत असलेल्या गुरसाळे बंधाऱ्यात ही धक्कादायक घटना आढळून आली आहे, एका व्यक्तीचा पोत्यात भरलेला मृतदेह निदर्शनास आला .
पोत्यात बांधून या अनोळखी व्यक्तीला बंधाऱ्यात टाकण्यात आल्याचे दिसत आहे. ३० ते ३५ वर्षाचे वय असलेल्या या तरुणाची ओळख मात्र लगेच पटलेली नाही. मृत देहाची अवस्था देखील अत्यंत वाईट अशी झालेली आहे. परिसरात दुर्गंधी सुटल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस अधिक तपास करीत असून, लवकरच या घटनेतील रहस्य बाहेर येण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !