शोध न्यूज : कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा करण्यास अजित पवार यांना मराठा समाजाने विरोध दर्शवला असून, पूजेला आलेच तर त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा देण्यात आला आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज खवळला असून, गावोगावी उपोषणे सुरु झाली आहेत, नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. खासदारांच्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत. तर राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांना बारामतीतच प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यानंतर पंढरपूर येथे देखील मराठा समाजाने अजित पवार यांना जोरदार इशारा दिला आहे .
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीची आषाढीची शासकीय महापूजा, मुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते तर, कार्तिकी एकादशीची महापूजा, उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते. परंतु मराठा समाजाने आता कार्तिकीची महापूजा करण्यासाठी, उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी येऊ नये असे सांगितले आहे. महापुजेला येत असाल तर, मराठा आरक्षणाचा अध्य्यादेश घेवून या, रिकाम्या हाताने आलाच तर तुमच्या तोडला काळे फासले जाईल, असा स्पष्ट आणि सणसणीत इशाराच मराठा समाजाने दिला आहे. मंदिर समितीला देखील मराठा समाजाने पत्र दिले असून, कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा, एखाद्या वारकऱ्याच्या हस्ते करावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
कार्तिकी एकादशीची महापूजा २३ नोव्हेंबर रोजी होत असून, या महापूजेसाठी उप मुख्यमन्त्री आले तरी त्यांच्या हस्ते महापूजा होऊ देणार नाही, उलट त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा देण्यात आला आहे. (Maratha brothers oppose Vitthal Puja to Ajit Pawar) आधीच मराठा आंदोलन उग्र होत असताना आता, थेट अजित पवार यांनाच मोठा इशारा देण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !