BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ ऑक्टो, २०२३

पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर सख्ख्या भावांचा अपघात !






शोध न्यूज : पंढरपूर - मोहोळ दरम्यान दोन सख्ख्या भावांचा अपघात झाला असून यात एका भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर दुसरा भाऊ या अपघातात गंभीर जखमी झाला आहे.


पेनूर गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात एका कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला आहे.  माढा तालुक्यातील वेताळवाडी येथील भागवत लक्ष्मण राउत आणि त्यांचा भाऊ औदुंबर लक्ष्मण राऊत हे दोघे दुचाकीवरून निघाले होते. पंढरपूर तालुक्यातील व्हळे येथे त्यांच्या नातेवाईकाच्या तिसऱ्या दिवसाच्या विधीसाठी ते गेले होते आणि तेथून ते परत निघाले होते. पंढरपूर - मोहोळ रस्त्याने ते निघालेले असताना पेनूर हद्दीतील पाटकूल फाट्याजवळ पोहोचले असाताना,  भरधाव वेगाने आलेल्या कारने त्यांना जोराची धडक दिली. डाव्या बाजूने येवून ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न या कारने केला आणि यातच दुचाकीला जोरदार धडक दिली.


सदर कार ही भरधाव वेगाने येत असल्याने जोराची धडक बसली आणि यात भागवत राउत ( वय ४५ ) हे रस्त्यावर फेकले गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्यास जबर मार लागला. पायाला देखील जोराचा मार लागला.  ( Accident on Pandharpur - Mohol road) यावेळी ते जागीच म्रुत्युमुखी पडले. त्यांचे भाऊ औदुंबर राऊत हे देखील या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगाने येऊन, दुचाकीला धडक देणाऱ्या कारचा चालक मात्र अपघातानंतर कार (एमएच-12 एचझेड 9094) जागेवर ठेवून तेथून पळून गेला आहे.  मोहोळ पोलिसात या घटनेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !