BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ ऑक्टो, २०२३

फुग्यात हवा भरता भरता घडले भलतेच, एकचा मृत्यू, अकरा जखमी !





शोध न्यूज : फुग्यात हवा भरता भरता भलतीच आणि अनपेक्षित घटना घडली असून यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य अकरा लहान मुले जखमी झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील या घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. 


अलीकडे फुगे हे कार्यक्रमासाठी महत्वाचे बनले आहेत. वाढदिवस असो अथवा लग्न समारंभ असो, फुगवलेले फुगे कार्यक्रमाची शोभा वाढवत असतात. लहान मुलांच्या वाढदिवसाला तर फुगेच फुगे दिसत असतात. एकावेळी लागणारे एवढे फुगे एकदम फुगविणे हे अशक्य आणि अवघड असल्याने शिवाय त्यात गॅस भरला जात असल्याने वेगळीच कसरत करावी लागते. गॅस सिलिंडरच्या मदतीनेच हे फुगे फुगवले जातात. अनेक फुगेवाले गावात, शहरात फिरून फुगे विकत असतात आणि  लहान मुले त्याच्या सभोवताली गर्दी करीत असतात. गॅस सिलेंडरच्या सहाय्याने तो फुगे भरून मुलांना विकत होता . गॅसच्या मदतीने  फुगे फुगवले जात असताना ही मोठी घटना घडली आहे. सुदैवाने  यात लहान मुलांच्या जीविताला धोका होऊ शकला नाही, अन्यथा मोठा अनर्थ समोर आला असता.  फुग्यात हवा भरताना गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन फुगेवाल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लातूर शहरातल्या तावरजा कॉलनी भागामध्ये  ही घटना घडली आहे.


बीड जिल्ह्यातील वाघाळा -राडी येथील ४५ वर्षीय राम इंगळे हा फुगेवाला फिरून फुगे विकत होता.  फुगे विकत विकत तो लातूर येथील तावरजा वसाहतीत आला होता. यावेळी लहान मुले त्याच्याकडून फुगे विकत घेत होती आणि इंगळे हे फुगे फुगवून त्यांना विकत होते. गॅस सिलिंडर मधून गॅस वापरून तो फुगे फुगवत असतानाच, गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला आणि राम इंगळे हा फुगेवाला जागीच मृत्युमुखी पडला. फुगे विकत घेण्यासाठी आलेल्या मुलांतील अकरा मुले देखील यात जखमी झाली आहेत. या घटनेने संपूर्ण वसाहतीत एकच खळबळ उडाली. पालक आपल्या मुलांकडे धावले, जखमी झालेली मुले गंभीर स्वरुपात जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.   


फुग्यात हवा भरणाऱ्या नायट्रोजन हेलियम गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन ही दुर्घटना घडली आहे.  या घटनेने पालकात मोठी घबराट निर्माण झाली असून, अशा प्रकारे स्फोटक बाबी सोबत घेवून फिरणाऱ्यावर शासनानेच तत्काळ बंदी घालावी अशी मागणी या पालकांनी केली आहे. (Death of an inflator while inflating a balloon.) गावोवाव, शहरातील रस्त्यारस्त्यावर अशा प्रकारे फुगे विकणारे लोक दिसतात आणि त्यांच्याजवळ मुलांचीही गर्दी असते. या घटनेने मात्र फुगे विक्रेत्यांच्या पोटावर देखील आता पाय येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी देखील धोकादायक वस्तूंवर निर्बंध आणायलाच हवेत अन्यथा यापेक्षाही मोठी घटना घडू शकते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !