शोध न्यूज : आम्ही दोघांचा खून करण्यासठी आलोय, असे म्हणत पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे चोरांनी मोठी चोरी केली आणि पसार देखील झाले. चोरीच्या घटना वाढत आहेत तसे, चोरांचे मनोधैर्य देखील वाढताना दिसत आहे. याचा प्रत्यय गादेगाव येथे आला आहे.
पंढरपूर तालुक्यातील गाडेगाव येथे घरात एकटी असलेल्या महिलेच्या गळ्याचा चाकू लावून भीती घातली आणि धमकी देत या चोरांनी चोरी केली. गाडेगाव येथील उषा सोमनाथ बागल या रात्री घरात एकट्याच होत्या , घरातील अन्य सदस्य परगावी गेले होते. उषा बागल या घराचा दरवाजा उघडा ठेवून झोपल्या होत्या. मध्यरात्री त्यांना कपात उघडल्याचा आवाज आला या आवाजाने त्या जाग्या झाल्या असता. दोन व्यक्ती घरात घुसल्या असल्याचे त्यांना दिसले. घरात चोर घुसले असल्याचे पाहून त्यांनी आरडा ओरडा करण्यास सुरुवात केली पण चोरांनी त्यांना धमक्या द्यायला सुरुवात केली. एवढेच नव्हे तर, त्यांनी उषा बागल यांच्या गळ्याला चाकू लावला. .चुपचाप सो जा, हम दो लोगो का खून करके आये है, चिल्लाएगी तो मार डालुंगा, तुम्हारे पास क्या है वो दे दो, और चादर ओढ के सो जा, अशी धमकी त्यांनी दिली. यामुळे उषा घाबरल्या आणि तशाच पडून राहिल्या.
चोरांनी कपाटातील ३४ ग्रॅम सोने, अंदाजे अडीज भार चांदीचे दागिणे, ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल, ४० हजार रुपयांची रोख रक्कम पळवून नेली आहे. (In Pandharpur taluka, house entry and theft at knife point) जाण्यापूर्वी ते उषा यांच्या जवळ आले आणि . तुम्हारे पास क्या है वो दे दो असे म्हणताच घाबरलेल्या उषा यांनी कानातील रिंगा व गळ्यातील मंगळसुत्र त्यांना दिले. या घटनेने गादेगाव परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांच्या मनात चोरांची दहशत निर्माण झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !