BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ मे, २०२३

बाजार समिती संचालक होण्यासाठी तीस लाख !

 




शोध न्यूज : पराभूत उमेदवाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी तब्बल तीस लाखांची लाच मागितली आणि ती घेताना एका वकिलासह उपनिबंधक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. लाचेचा तीस लाखांचा आकडा ऐकून अनेकांचे डोळे गरगरले आहेत.


सरकारी अधिकारी आणि लाच यांचा परस्परांशी निकटचा संबंध आहेच पण लाचेलाही काही मर्यादा नाही हेच खरे नावाच्या खोट्या माणसाने दाखवून दिले आहे. नाव खरे पण कर्तृत्व सगळे खोटे, असा एक प्रकार उघडकीस आला आहे. कुठलीही निवडणूक म्हटले की, पैशाला मोल नसते. निवडून येण्यासाठी उमेदवार पाण्यासारखा पैसा खर्च करतोच पण खुर्चीसाठी वाट्टेल ते करण्याची त्याची तयारी असते. नेमके हेच एका उप निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्याने हेरले आणि तीस लाखांची लाच मागितली. केवळ मागितली नाही तर, ती घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात पकडलाही ! नाशिक जिल्ह्यातील लाखाे सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणासह आवश्यक परवानग्या आणि निवडणुका लावणाऱ्या जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊसाहेब खरे  यांना ३० लाख रुपयांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. खरे यांनी काॅलेजराेडवरील 'आई' या निवासस्थानी ही लाच स्वीकारली असून त्यांच्या वकिलाला अटक झाली आहे.


दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका अलीकडेच पार पडल्या.  बाजार समितीमध्ये तक्रारदार हे संचालकपदी कायदेशीर आणि वैधपणे निवडून आले आहेत. त्यांच्या निवडीविरुद्ध उपनिबंधक खरे यांच्याकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणावर सुनावणी घेण्यासाठी आणि निकाल संचालकाच्या बाजूने देण्यासाठी लाचखोर खरे आणि त्याचा वकील सभद्रा यांनी तब्बल ३० लाख रुपयांची लाच मागितली होती. लाचेत साबद्रा यांना टक्केवारी द्यावी लागणार असल्याने खरे याने थेट तक्रारदाराकडेच लाचेची मागणी केली आणि त्यांना आपल्या घरी बोलावून घेतले. तक्रारदारास लाचेच्या तीस लाख रुपयांसह सोमवारी रात्री कॉलेज रोडवरील त्यांच्या राहत्या घरी बोलावले होते. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि तक्रारदाराकडून तीस लाखांची लाच घेताना खरे आणि त्यांच्या साथीदारास लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली.



जिल्हा उपनिबंधक खरे याच्या घराचीही झाडाझडती घेण्यात आली. त्याच्या घरात तब्बल १७ लाखांची रोकड आणि ४५ तोळे सोने आढळून आले आहे. ही रक्कम आणि सोने जप्त करण्यात आले आहेच पण, (Market Committee Election, District Sub-Registrar in Bribery Trap) निवडणुकीच्या प्रकरणात देखील लाच घेवून कशा प्रकारे निकाल बदलवले जातात याचेच हे बोलके उदाहरण ठरले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !