शोध न्यूज : चित्रपटात आघाडीची हिराईन बनविण्याचे आमिष दाखवत एका तरुणीवर सहा महिने बलात्कार केल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून या कथित दिग्दर्शकाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अत्यंत पवित्र असलेली चित्रपटसृष्टी काही मोजक्या लोकांच्यामुळे बदमान होत असून कास्टिंग काऊचची अनेक प्रकरणे यापूर्वी समोर आलेली आहेत. अनेक आघाडीच्या अभिनेत्रीनी देखील अशा प्रकरणांना वाचा फोडली आहे. कलेचे हे क्षेत्र अत्यंत पवित्र आहे पण कलेशी प्रतारणा करीत किंवा कलेच्या पावित्र्याशी काही देणेघेणे नसलेले निर्माते, दिग्दर्शक गैरफायदा घेत काही अनुचित गोष्टी करतात आणि चित्रपट क्षेत्र कलंकित करण्याचा प्रयत्न करतात. काही भामटे चित्रपट क्षेत्राशी कसलाही संबंध नसला तरी तसे भासवत अनेक तरुण तरुणींची फसवणूक करतात. अशा प्रकारच्या घटनाही अनेकदा समोर येत असतात परंतु आता सोलापूर जिल्ह्यातही अशी एक मोठी घटना समोर आली असून हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले आहे. तरुणीचे आरोप पाहून प्रत्येकजण हादरला असून सिनेमाचे वेड असलेल्या तरुणींनी 'सावध' असण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील मूळ रहिवाशी असलेली तरुणी पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे सद्या राहत आहे. या तरुणीने बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार अहमदनगर येथील दिग्दर्शक संजय उत्तमराव पाटील याने या तरुणीवर चित्रपटात आघाडीची हिराईन बनविण्याचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार केला आहे. "भाऊचा धक्का" या नावाचा एक चित्रपट आपण बनवत असून या चित्रपटात नायिकेची भूमिका देण्याचे आमिष या तरुणीला दाखविण्यात आले होते. संजय पाटील हा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार होता आणि त्यासाठी त्याने एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा बारीशी तालुक्यातील येडशी परिसरात करण्यात आले होते आणि यासाठी कलाकारांची राहण्याची व्यवस्था उक्कडगाव येथे एका महाविद्यालयाच्या इमारतीत केली गेली होती. येथेच संजय पाटील याने या तरुणीशी सलगी वाढवली आणि एके दिवशी आपल्या खोलीत बोलावून "तुला मी टापची हिराईन बनवतो. तुला माझ्या सिनेमात मेन रोल देतो", असे आमिष दाखवत बलात्कार केला. तुला सिनेमात काम हवे असेल तर तुला हे सगळे करावेच लागेल, असेही त्याने तिला बजावले.
या गंभीर घटनेची तक्रार करण्याची तयारी सदर तरुणीने केली होती पण तक्रार केल्यास सिनेमात काम करण्याची आपली संधी जाईल या भीतीने तरुणी गप्प बसली. तिच्या या गप्प बसण्याचा पाटील याने अधिकच फायदा घेतला आणि तिच्यावर वारंवार बलात्कार करीत राहिला. हा प्रकार वाढत गेल्याने सदर तरुणीने संजय पाटील याच्याविरोधात बार्शी तालुक्यातील पांगरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी दिग्दर्शक म्हणवून घेणाऱ्या संजय पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.(Lure of becoming an actress in a film, rape for six months) या मोठ्या आणि धक्कादायक घटनेची माहिती बाहेर येताच सामान्य नागरिक देखील हादरले असून चित्रपट क्षेत्राला बदनाम करण्याचा प्रकार पुन्हा एकदा घडला आहे. याप्रकरणी पांगरी पोलीस आता अधिक तपास करीत आहेत. संजय पाटील हा खरोखरच चित्रपट दिग्दर्शित करणार होता का ? यासाठी कार्यशाळा घेण्यासाठी त्याने बार्शी तालुकाच का निवडला ? आदी प्रश्नांची उत्तरे आता पोलीस तपासात मिळणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !