BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१५ मार्च, २०२३

गोबर गॅसच्या टाकीत गुदमरून चार जणांचा मृत्यू !



शोध न्यूज :  गोबर गॅसच्या टाकीत पडून गुदमरुन चौघांचा मृत्यू झाला असून मृतांत एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. या अत्यंत ह्रदयद्रावक घटनेने खळबळ उडाली आहे. 


गाईच्या गोठ्यातील गोबर गॅसची टाकी स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात बारामती तालुक्यातील खांडज येथे अत्यंत मोठी दुर्घटना घडली. गॅस टाकीची स्वच्छता करताना ही घटना घडल्याचे सांगितले जात असून  सदर टाकी ही इंग्रज काळातील आहे. या टाकीच्या चेंबरची स्वच्छता करण्यासाठी आधी एक जण खाली उतरला परंतु तो टाकीतच अडकला गेला. त्यानंतर त्याला वाचविण्यासाठी गेलेले अन्य तिघेही त्याच टाकीत अडकले आणि चौघांचीही मृत्यू झाला. बायोगॅसच्या टाकीत गुदमरून हे चारही मृत्यू झाले असल्याचे समोर आले आहे. (Four people died after suffocation in dung gas tank) त्यामध्ये आटोळे कुटुंबीयातील तिघे, तर गव्हाणे कुटुंबीयांमधील एका व्यक्तीचा समावेश आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भानुदास अंबादास आटोळे (वय ६०) , प्रवीण भानुदास आटोळे( वय ३२), प्रकाश सोपान आटोळे(वय ५५) आणि बाबा पिराजी गव्हाणे(वय ३८) यांचा समावेश आहे. 


गॅस टाकीत अडकलेल्या चौघांचाही श्वास गुदमरला आणि त्यांना बाहेर देखील येता आले नाही, पुरेसा श्वास घेता न आल्याने चौघेही टाकीतच बेशुद्ध झाले त्यामुळे त्यांना तातडीने सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.  एक जण अडकला म्हणून इतर लोक त्याच्या मदतीसाठी आणि त्याला वाचविण्यासाठी गेले परंतु कुणीच कुणाला वाचवू शकले नाही तर चौघांचीही एकाच जागी मृत्यू झाला त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रत्येकजण या घेणेबाबत हळहळ व्यक्त करीत आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भानुदास अंबादास आटोळे (वय ६०) , प्रवीण भानुदास आटोळे( वय ३२) हे पिता-पुत्र आहेत. तसेच प्रकाश सोपान आटोळे(वय ५५) हे चुलते आहेत. 


एकाच कुटुंबातील तिघांचा आणि अन्य एकाचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झळा असून यामुळे आटोळे गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच माळेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. माळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने प्राप्त स्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती परिसरात समजताच अनेकांनी घटनास्थळी आणि बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाकडे धाव घेतली असून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे. 





.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !