BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० मार्च, २०२३

पंढरपूर तालुक्यातील शेतकरी महिलेला कोल्हापुरात गंडा !

 


शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील एका शेतकरी महिलेला कोल्हापुरात गंडा घालण्यात आला असून याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यावर अशा  महिलांना समाज शक्य ती मदत करण्यासाठी पुढे येतो पण काही भामटे अशा महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा उठवत त्यांना लुटण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रकार पंढरपूर तालुक्यातील एक महिलेच्या बाबतीत घडला असून सदर महिलेने मात्र फसवणूक करणाऱ्या दोघांच्या विरोधात आवाज उठवून थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. पंढपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील आशा नागनाथ घाडगे यांनी कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सफाई ऍग्रो इंजिनियरिंग चे मालक विजय पवार आणि रुपेश पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर ट्रेलर बनविण्यासाठी झालेल्या व्यवहारातून १ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल कसबा बावड्यातील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.


पंढरपूर तालुक्यातील मुंढेवाडी येथील नागनाथ बंडा घाडगे यांनी २०२१ साली ऊसाची वाहतूक करण्यासाठी लागणारा ट्रेलर बनविण्यासाठी सफाई ॲग्रो इंजिनिअरिंगला सांगितले होते. हा ट्रेलर तयार करण्यासाठी ५ लाख ६५ हजार रुपयांना व्यवहार निश्चित करण्यात आला होता. यासाठी ऍडव्हान्स म्हणून रोख ७५ हजार रुपये देण्यात आले होते तसेच ऑनलाईन ५० हजार आणि ४८ हजार रुपये सफाई ॲग्रो इंजिनिअरिंगला देण्यात आले होते. एकूण १ लाख ७३ हजाराची रक्कम सफाई ॲग्रो इंजिनिअरिंगला देण्यात आली होती परंतु त्यांना ट्रेलर मिळाला  नव्हता. दरम्यान नागनाथ घाडगे यांचे निधन झाले आणि सफाई ॲग्रो इंजिनिअरिंगचे मालक विजय पवार आणि त्याचा नातेवाईक रुपेश पाटील यांनी सदर ट्रेलर घाडगे याना देण्याऐवजी त्यांनी तो परस्पर विकला. (A farmer woman of Pandharpur taluka was cheated in Kolhapur)  ऍडव्हान्स म्हणून घेतलेली रक्कमही परत दिली नाही त्यामुळे आशा नागनाथ घाडगे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यानुसार सफाई ॲग्रो इंजिनिअरिंगचे पवार आणि पाटील या दोघांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !