BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ फेब्रु, २०२३

उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांना जीवे ठार मारण्याची धमकी !

 


शोध न्यूज : गुवाहाटीच्या रस्त्यावरून परत आलेले उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांना जीवे ठार मारण्याची धमकी आली असून नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाबाबत बोलल्यामुळे आपणास धमकी आल्याचा संशय आ. देशमुख यांनी व्यक्त केली आहे.



शिवसेनेतून एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदारांनी बंड केले होते त्यावेळी आमदार नितीन देशमुख हे गुवाहाटीच्या वाटेवरून सूरत येथूनच परत आले होते. आपल्याला बळजबरीने नेण्यात येत होते परंतु आपण अत्यंत कष्टाने सुटका करून घेतली आणि परत आलो असल्याचे त्यांनी सांगितले होते तेंव्हा राज्यभर त्यांची चर्चा झाली होती आणि संपूर्ण राज्याला निष्ठावंत आमदार म्हणून त्यांचा परिचय झाला होता. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या संपत्तीची चौकशी सुरु करण्यात आली असल्याने आणि त्यांनी थेट आव्हान दिल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले होते. त्यातच आज त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी मिळाल्याने राज्याच्या राजकारणात विशेषत: उद्धव ठाकरे शिवसेनेत प्रचंड खळबळ उडाली असून आ. देशमुख यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाचा उल्लेख केल्याचे आणखी खळबळ वाढली आहे. 


आ, देशमुख यांना आज दुपारच्या दरम्यान दोन फोन आले असून हे दोन्ही फोन वेगवेगळ्या क्रमांकावरून आले होते. अज्ञात व्यक्तीने धमकी देताना  केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांचे नाव घेत आपल्याला जीवे ठार मारण्याबाबत धमकी देण्यात आली असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. "आम्ही अनेक लोकांना मारून समुद्रात फेकून दिलेले आहे, त्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही, तुम्ही मुंबईत आल्यावर तसाच समाचार तुमचाही घेऊ" अशा भाषेत अज्ञात हल्लेखोराने धमकी दिली असल्याचे आमदार देशमुख यांनी म्हटले आहे.राणे कटुंबाविरोधात बोलल्यामुळे ही धमकी आली आहे असा संशय आमदार देशमुख यांनी व्यक्त केला आहे.  धमकीचे हे फोन आपण रेकॉर्ड केलेले असून आपणही त्याला आव्हान दिले असल्याचे देशमुख यांनी सांगितले आहे.

 

"मंगळवारी मुंबईला येत आहे, नारायण राणे या, नितेश राणे, निलेश राणे कुणीही या. मी तुमची नरीमन  पॉंईटला वाट पाहतो" असे आपण आव्हान दिले आहे या अज्ञात धमकीखोराने केलेल्या उल्लेखावरून अशा प्रकारे किती लोकांना मारून समुद्रात फेकले गेले आहे याची शासनाने चौकशी करण्याची आवश्यकता व्यक्त करून त्यांनी याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. (Threat to kill Uddhav Thackeray MLA Nitin Deshmukh) आ. देशमुख हे उद्याच मुंबईला जाणार आहेत. धमकीच्या या प्रकरणाने खळबळ उडवून दिली असून यात राणे कुटुंबाचे नाव आल्याने या धमकीचे गांभीर्य आणखी वाढले आहे

-----------------------




पंढरपूर येथील सुप्रभात मंडळाचे जेष्ठ सदस्य एड राजेश  भादुले यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करण्यात आले असून मित्र मंडळीनी भादुले यांचा सत्कार  करून शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी निवृत्त उपविभागीय अभियंता पी. व्ही. कुलकर्णी, सर्वश्री शेळके, वस्ताद ननवरे, देशमुख, संजय काळे, ढवळे, मोरे, फिरोज शेख  आदी उपस्थित होते.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !