BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ फेब्रु, २०२३

पट्ठ्याने कापला नूतन आमदारांचाच खिसा !



शोध न्यूज : नव्याने झालेले आमदारसाहेब वेगळ्याच आनंदात रममाण झालेले होते आणि त्यातच एका पट्ठ्याने गर्दीचा फायदा उठवत थेट आमदार साहेबांचाच खिसा कापून हजारो रुपये घेवून गेल्याची अजब घटना उघडकीस आली आहे. 


कुठलीही गर्दी असली की चोर, खिसेकापू (
pick pocket) हे हमखास या गर्दीत सहभागी होत असतात. मग ही गर्दी देवाचं दरातील असो किंवा कुणाच्या अंत्ययात्रेची ! या चोरांना त्याच्याशी काहीच देणेघेणे नसते. त्यांची नजर फक्त 'जड' खिसे शोधत असते. हे चोर एवढे चलाख असतात की डोळ्यातील काजळ काढून घेतले तरी कुणाला कळू देत नाहीत. निवडणुकीच्या सभा अथवा मिरवणूक असली तरी ही चलाख मंडळी आपली हातचलाखी दाखवत असतात. असाच प्रकार एका विजयी मिरवणुकीत घडला असून बहाद्दर चोरट्याने थेट नव्याने निवडून आलेल्या आमदार साहेबांचाच खिसा हलका केला. तब्बल ७५ हजार रुपयावर डल्ला मारून हा खिसेकापू गर्दीतून पसारही झाला. आपला खिसा कापला गेला याची जाणीव झाली पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता आणि चोर आपल्या वाटेने निघूनही गेला होता. मोठी रक्कम त्याच्या हाताला लागल्यामुळे आता पुन्हा त्याला त्याच गर्दीत दुसरीकडे हात साफ करण्याची आवश्यकताच उरली नव्हती. 


नुकतीच विधान परिषद निवडणूक झाली आणि विजयाचा जल्लोष देखील साजरा झाला. निवडणुकीचा धुरळा आणि विजयाचा जल्लोष या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कोकण शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विजय मिळवला आणि कार्यकर्त्यात जोरदार जल्लोष करण्यात आला. नव्याने आमदार झालेले म्हात्रे यांना खांद्यावर घेवून कार्यकर्ते नाचू लागले पण याच संधीचा फायदा घेत खिसेकापुने आपली हातचलाखी दाखवली. निवडणुकीचा निकाल येताच मतमोजणी केंद्राच्या बाहेर म्हात्रे यांचं कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. म्हात्रे हे विजयामुळे आनंदित झालेले होते तर कार्यकर्ते प्रचंड उत्साहात होते. म्हात्रे यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी उसळली. या मंडळीनी म्हात्रे यांना गराडाच घातलेला होता. उत्साही कार्यकर्त्यांच्या आनंदाला तर काही पारावर नव्हता. त्यांनी विजयी उमेदवार म्हात्रे यांना उचलून खांद्यावर घेतले. अवघा जल्लोष सुरु होता आणि कार्यकर्ते नाचत राहिले होते. 


काही वेळ हा जल्लोष सुरु असताना अचानक नूतन आमदार म्हात्रे यांचा हात खिशाकडे गेला आणि आपले खिसे रिकामे असल्याचे त्यांना जाणवले. विजयी मिरवणुकीच्या जल्लोषात आपलेच खिसे कापले गेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि आनंदात असताना त्यांना हा वेगळाच धक्का बसला. त्यांच्या समोरच्या खिशात असलेले ५० हजार रुपये आणि मागच्या खिशात असलेले २५ हजार रुपये असे मिळून ७५ हजार रुपये त्यांच्या खिशातून गायब झाले होते. जल्लोषाच्या गर्दीत ही घटना घडली हे त्यांच्या लक्षात आले पण नेमके कधी आणि कुठे हा प्रकार घडला याचा काही अंदाज येत नव्हता. विजय झाल्यानंतर बदलापूर, नवी मुंबई आदी ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी विजयी रॅली काढली होती. (MLA Mhatre's pocket was cut in the victory procession)  नवी मुंबईत हा प्रकार घडला असण्याची शक्यता मात्र व्यक्त करण्यात आली. मतमोजणी केंद्रावर असलेल्या पोलिसांकडे लगेच तक्रार देण्यात आली पण दरम्यान बराच विलंब झालेला होता. एकीकडे जल्लोष तर दुसरीकडे ही वेगळीच घटना घडल्याने या खिसेकापुची मोठी चर्चा मात्र होत राहिली आहे.   

(The newly elected MLAs were reveling in a different kind of joy, and in that a strange incident took advantage of the crowd and took thousands of rupees directly from the pockets of the MLAs.)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !