BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ जाने, २०२३

गजबजलेल्या सोलापूर गड्डा यात्रेत एकाचा खून ! एक गंभीर जखमी !!

 


शोध न्यूज : सोलापुरातील गजबलेल्या गड्डा गड्डा यात्रेत अनेक लोकांची गर्दी असताना एकाचा  खून करण्यात आला असून दोघे जण जखमी झाले आहेत. आर्थिक कारणावरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.


सोलापुरातील गड्डा यात्रा प्रसिद्ध असून या यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. सद्या यात्रा सुरु असल्याने ही यात्रा गजबजली आहे तसेच यात्रेच्या निमित्ताने राज्यातून आणि परराज्यातून अनेक विक्रेते आलेले आहेत. यात्रेत अनेक दुकाने थाटण्यात आली असून भाविकांची मोठी रेलचेल आहे. अशा गजबजलेल्या यात्रेत भरदिवसा दोन गटात आर्थिक कारणावरून वाद सुरु झाला आणि या वादाचे रुपांतर परस्परावर हल्ले करण्यात झाले. यात एकाचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला त्यामुळे यात्रीत प्रचंड गोंधळ उडाला आणि भाविकात देखील घबराट निर्माण झाली. 


किरकोळ कारणावरून विक्रेत्याच्या दोन गटात वाद सुरु झाला आणि हा वाद पुढे भलत्याच टोकाला गेला. परप्रांतीय विक्रेते यात्रेत आपला व्यवसाय करीत असताना विक्रेत्यांच्या दोन गटात आर्थिक कारणावरून हा वाद सुरु झाला.  एका विक्रेत्याचा खून झाला असून अन्य दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गड्डा यात्रेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच ही घटना घडली असून हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी आहे. येथे हा प्रकार आज भरदिवसा घडला. या घटनेत मृत झालेली व्यक्ती आणि जखमी हे उत्तर प्रदेशातून व्यवसाय करण्यासाठी गड्डा यात्रेत आलेले होते. खुनाची घटना घडताच आरोपींनी पलायन केले आहे. आठ हजार रुपयांच्या वादातून ही घटना घडली असल्याचे सांगितले जात आहे.  यावेळी आर्थिक वादातून दहा ते बारा लोकांनी तिघांवर जोरदार हल्ला केला. यात एका तरुणाच्या डोक्यात जबर वार करण्यात आला त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. 


घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तोपर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला असल्याने त्यांचा मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. भर यात्रेत खुनासारखी गंभीर घटना घडल्याने यात्रेत गोंधळ उडाला तसेच भाविकांत चिंताही व्यक्त करण्यात येत आहे. (One stabbed to death in the crowd during the Solapur Gadda yatra) यात्रेसाठी पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात आहे परंतु तरीही हल्लेखोरांनी गर्दीच्या ठिकाणीही हल्ला आणि एक खून करण्याचे धाडस केले आहे याचेही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. खून करून आरोपी पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !