BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ जाने, २०२३

मुख्यमंत्री साहेब, माझ्या मुलाला आमदार करा ! आईची साद !

 



शोध न्यूज : 'मुख्यमंत्री साहेब, माझ्या मुलाला आमदार करा' अशी साद एका आईने मुख्यमंत्री शिंदे यांना घातली असून तसे एक पत्रच या आईने मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. 

लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मुख्यामंत्री यांच्याकडे लोक विविध प्रकारच्या मागण्या करीत असतात. त्या किती पूर्ण होतात हा भाग वेगळा असला तरी मोठ्या आशेने आणि अपेक्षेने लोक त्यांच्याकडे अर्ज विनंती करतात, समक्ष भेटी घेतात. व्यक्तिगत अथवा सामाजिक कामाची मागणी केली जाते परंतु बीड जिल्ह्यातील एका आईने मात्र आपल्या मुलाला आमदार करा म्हणूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे. त्यांनी एक पोष्टकार्ड लिहून ही मागणी केली असून हे पोष्ट कार्ड राज्यभर व्हायरल होत आहे. आई आपल्या लेकरासाठी काहीही करायला तयार असते आणि ती करतेही हेच या घटनेने पुन्हा एकदा समोर आलेले आहे. या पत्रात या आईची तळमळ देखील व्यक्त झालेली आहे. 


आपला मुलगा श्रीकांत हा आमदार व्हावा असं या आईला वाटत असून आपला मुलगा समाजकार्य करीत आहे आणि त्याला विधान परिषदेवर आमदार करा अशी इच्छा दहिफळ येथील सागरबाई विष्णू गदळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. (Make my son MLA, mother's demand to Chief Minister) आपला मुलगा श्रीकांत याला आमदार केल्यानंतर तो मानधन म्हणून केवळ एक रुपयाचे मानधन घेईल असे देखील त्यांनी या पत्रात म्हटले आहे.  


आपला मुलगा गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील शेतकरी आणि गोरगरीब जनतेच्या पश्नासाठी सतत काम करीत असून त्याच्याकडे कोणतेही पद नसल्याने त्याला अडचणी येत आहेत. त्यामुळे आपला मुलगा श्रीकांत याला आमदार करावे, मानधन म्हणून तो केवळ दरमहा १ रुपया घेईल. आमदार होऊन त्याला शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करायचा आहे. गरिबी हटविण्यासाठी तरुणाना रोजगार उपलब्ध करून देत गरीबिमुक्त महाराष्ट्र करायचा आहे. यासाठी त्याला विधान परिषदेवर आमदार करण्याची मागणी या आईने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. आता या आईचे पत्र वाचून मुख्यमंत्री काय उत्तर देतात की या आईची इच्छा पूर्ण करतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.











कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !