BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ डिसें, २०२२

स्वत:चाच खून झाल्याचा केला बनाव आणि -----




दु:खद : स्व. आमदार भारतनाना भालके यांच्या मातोश्री कुशालाबाई तुकाराम भालके यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन !


शोध न्यूज : दुसऱ्याचे मुंडके छाटून केला खून आणि आपले कपडे मृतदेहाला घालून आपलाच खून झाल्याचा बनाव केला पण त्याचे बिंग फुटले असल्याचा एक चित्रपटासारखा प्रसंग उघडकीस आला आहे.


दुसऱ्याचा खून करून आपलाच खून झाल्याचा बनाव करून स्वत: गायब होण्याचा एक प्रसंग 'अंधा कानून' या चित्रपटात आहे. अशा घटनेवरच हा चित्रपट बेतलेला असून तो प्रचंड गाजलाही ! हिंदी चित्रपटात असे प्रसंग पहायला मिळत असतात परंतु पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील चऱ्होली खुर्द या गावात प्रत्यक्षात अशी एक घटना घडली परंतु ती उघडकीस आली आहे. सुभाष उर्फ केरबा थोरवे या नराधमाने आपल्या प्रेयसीसोबत दूर जाऊन राहण्यासाठी भलतेच कांड केले पण या घटनेत अनेक संशय निर्माण झाले आणि अखेर त्याच्या हातात बेड्या पडल्या आहेत. चित्रपटाला लाजवेल असा गुन्हेगारी प्रकार या नराधमाने केला असल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे. रवींद्र भिमाजी घेनंद नावाच्या ४८ वर्षीय व्यक्तीचा अत्यंत निर्घृण खून करून आपलाच खून झाल्याचा बनाव या बहाद्दराने केला आणि आपले कपडे मृतदेहाला घालून स्वत: पसार झाला. 


सुभाष उर्फ केरबा थोरवे या ६५ वर्षे वयाच्या नराधामांचे एका महिलेशी प्रेमसंबंध होते त्यामुळे त्याला आपल्या प्रेयसीसोबत दूर कुठेतरी जाऊन रहायचे होते. त्यासाठी त्याने एक धक्कादायक युक्ती केली, त्याने रवींद्र घेनंद यांना शेतात बोलावून घेतले. तो तेथे आल्यावर कोयत्याने त्यांचे मुंडके छाटले, तो मृत्युमुखी पडल्यावर आपले कपडे त्याच्या अंगावर घातले आणि  ट्रॅक्टरला जोडलेल्या रोटर मशीनमध्ये मृतदेह घालून तो फिरवला. नंतर मृतदेहाचे मुंडके, कोयता, कपडे लपवून ठेवले आणि सगळा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि स्वत: गायब झाला. त्याच्या कुटुंबीयांना जेंव्हा हा प्रकार दिसला तेंव्हा सगळेच हादरून गेले. मुंडके नसलेले प्रेत आणि मृतदेहावर असेलेले थोरवे याचे कपडे पाहून कुटुंबीयांना हा  मृतदेह थोरवे याचाच आहे याची खात्री पटली. अपघात समजून कुटुंबीयांनी त्याचावर अंत्यसंस्कार केले आणि दशक्रिया विधीही केला. 


सातशे आठशे लोकांच्या उपस्थितीत थोरवे याचा दशक्रिया विधी झाला, त्याला श्रद्धांजली अर्पण करणारा भला मोठा फलक लावण्यात आला. 'तुमचा सहवास नसला तरी स्मृती सुगंध देत राहील, जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुमची येत राहील' अशा शब्दात श्रद्धाजली अर्पण करण्यात आली. त्याच्या श्रद्धांजलीपर अनेकांनी भाषणेही ठोकली आणि दशक्रियाविधी झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी थोरवे आपल्या घरी परतला. 


ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले, ज्याचा दहावा केला आणि आठशे लोक दहाव्याचे जेवण करून गेले तोच दुसऱ्या दिवशी हजार झाल्याचे पाहून  कुटुंबिय, नातेवाईक आणि गावकरी यांना तर धक्काच बसला. (Plot your own murder by killing someone else)  हा काय प्रकार घडला हा प्रश्न ज्याला त्याला पडला. पोलीस मात्र अपघाताचा तपास करीत होते आणि त्यांना शंका घेण्यासारख्या अनेक जागा दिसत होत्या. अखेर पोलिसांनी तपास करीत छडा लावला आणि थोरवे याला बेड्या ठोकण्यात आल्या. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !