शोध न्यूज : ग्रामपंचायत निवडणुकीत सून निवडून आल्याचा आनंद साजरा केला जात असतानाच विरोधकांनी सासऱ्याची पपईची बाग कापून आपला राग काढला. या प्रकाराचा परिसरात निषेध केला जात आहे.
ग्रामपंचायतीची निवडणूक झाली आणि निकाल लागून विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. निवडणुकीत कुणाची तरी हार आणि कुणाची तरी जीत ही ठरलेली असते. विजयाचा उन्माद करायचा नसतो आणि पराभव देखील पचवायचा असतो. प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी निवडणुकीतील हार सहन न झाल्याने मर्यादा ओलांडल्या जातात आणि परस्परात प्रचंड शत्रुत्व निर्माण होते. याच वैमनस्यातून एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत मजल जात असल्याचा घटना देखील समोर येतात. करोडी गावात तर एक अत्यंत निंद्य प्रकार घडला असून सामान्य शेतकऱ्याची पपईची बागच कापून टाकण्याचा अत्यंत संतापजनक प्रकार घडला आहे. निवडणुकीतील अत्यंत हीन अशा या प्रकारचा मोठा निषेध केला जात आहे.
करोडी (औरंगाबाद) गावातील शेतकरी रामभाऊ धोंडीबा दवंडे यांच्या शेतातील पपईची संपूर्ण बाग अज्ञात व्यक्तीची कापून टाकली आणि सामान्य शेतकऱ्याचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान करण्यात आले. रामभाऊ दवंडे यांची सून सोनाली दवंडे या ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या होत्या. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. दवंडे कुटुंब या विजयाने आनंदित झाले असताना काहीना हा विजय सहन झाला नाही आणि सोनाली दवंडे यांचे सासरे रामभाऊ दवंडे यांच्या शेतातील पपईची साडे तीनशे झाले अज्ञात व्यक्तींनी एका रात्रीतच कापून टाकली आणि आपला संताप व्यक्त केला आहे.
यावर्षीच्या अतिवृष्टीने शेतकरी आधीच अडचणीत आला आहे. सातत्याने येणाऱ्या संकटाने शेतकरी पिचून जात असताना रामभाऊ यांनी दिवसरात्र परिश्रम करून पपईची बाग फुलवली. ही बाग पक्व झाली होती आणि येत्या एक दोन दिवसातच पपई उतरवून बाजारात नेली जाणार होती. पण रामभाऊ दवंडे यांची सून ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाल्या आणि विरोधकांचे पित्त खवळले. एका रात्रीतून त्यांची संपूर्ण बाग नष्ट केली आणि रामभाऊना मोठा धक्का बसला. बागेची परिस्थिती सांगताना रामभाऊ यांच्या डोळ्यातून अश्रूचा पूर येत होता. एकीकडे निवडणुकीत सून निवडणूक आल्याचा आनंद असताना हा आनंदही हिरावून घेण्यात आला.
निवडणुकीत हार जीत असते आणि जनमताचा कौल मोठ्या मानाने स्वीकारायचा असतो. काही प्रवृत्ती मात्र पराभव पचवू शकत नाहीत आणि विजयाने देखील उन्माद येताना दिसतो. निवडणुकीत विजय झालेल्या उमेदवाराचाचे मोठ्या मनाने पराभूत उमेदवार अभिनंदन करीत असतो. लोकशाही प्रक्रियेने हा विजय झालेला असतो. (The daughter-in-law got elected and destroyed the father-in-law's farm) काही विकृत मंडळी मात्र पराभव पचवू शकत नाही आणि अशा प्रकारे लांछानास्पद कृत्य करताना दिसतात. एका शेतकऱ्याने जोपासलेली पपईची बाग अशा प्रकारे उद्ध्वस्त करण्याने अनेकांच्या मनाला यातना झाल्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !