BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ जुलै, २०२२

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अटकेची शक्यता !



मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या घरी आज सकाळीच ईडीचे पथक दाखल झाले असून त्यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 


गेल्या अडीच वर्षांत ईडीने महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांची, मंत्र्यांची  चौकशी केली असून राष्ट्रवादीचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख आणि दुसरे मंत्री नबाब मलिक याना अटक केली आहे. हे दोन्हीही नेते सद्या अटकेत असून त्यांना जामीन देखील मिळत नसल्याचे दिसून आले आहे. (Mahavikas Aaghadi) केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर वाढला असल्याचे आणि या यंत्रणेकडून केवळ विरोधकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप सतत होत आहे शिवाय अशा यंत्रणांच्या धमक्या देऊन भारतीय जनता पक्षाने शिवसेना फोडली असल्याचाही आरोप सतत केला जात आहे. 


भारतीय जनता पक्षात दाखल झालेल्या अथवा समर्थन दिलेल्या नेत्याची चौकशीही ईडी करीत नाही परंतु विरोधकांना टार्गेट केले जात असल्याचा आरोप देशभर होत आहे. त्यातच संजय राऊत ही तर शिवसेनेची तोफ असून सरकार पाडण्यासाठी मदत करा अन्यथा ईडी मागे लावू अशी धमकी आली असल्याचे संजय राऊत यांनी भर पत्रकार परिषदेत सांगितलेले होते. भारतीय जनता पक्षाशी संबंधित अनेकांच्या तक्रारी ईडी (ED) कडे देण्यात आल्या आणि पुरावेही देण्यात आले परंतु ईडी त्यांची चौकशी करीत नाही.  भाजपात प्रवेश केलेल्या अनेक नेत्यांच्या चौकशा पुढे ठप्प झाल्या आहेत अशा प्रकारचे आरोप सतत सुरु असतात


शिवसेना खा. संजय राऊत यांची चौकशी ईडीने सुरु केली असून पत्राचाळ प्रकरणात त्यांची चौकशी होत आहे. त्यांना यापूर्वी देखील ईडीचे समन्स आलेले असून चौकशीसाठी त्यांना बोलावण्यात आले होते. राऊत यांनी ईडी कार्यालयात हजेरी लावलेली असून त्यांना पुन्हा समन्स पाठविण्यात आले होते. यावेळी मात्र संजय राऊत हे ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत. संसदेच्या अधिवेशनाचे कारण देत त्यांनी ईडीकडे पुढील तारखेची मागणी केली होती. आज मात्र सकाळीच ईडी पथक संजय राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. सकाळी सकाळी हे पथक राऊत यांच्या घरी पोहोचले असून त्यांच्यासोबत सुरक्षा रक्षक देखील आहेत. ईडी पथक राऊत यांच्या घरी पोहोचल्यामुळे राऊत यांना ईडीकडून अटक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 


समन्स पाठवून देखील शिवसेना खासदार संजय राऊत हे ईडी कार्यालयात हजर झाले नाहीत आणि चौकशीत सहकार्य केले नाही त्यामुळेच ईडीचे पथक संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले असल्याचे सांगितले जात आहे. राऊत यांनी ईडीवर अनेकदा सणसणीत आरोप केले असून ईडीला आपण घाबरत नसल्याचे सांगून वारंवार आव्हान दिले आहे. कितीही कारवाया केल्या तरी आपण झुकणार नसून शिवसेना (Shivasena) सोडणार नाही असे देखील संजय राऊत यांनी अनेकदा ठणकावून सांगितले आहे. ईडीशी ताणलेले संबंध आणि भाजप विरोधी सतत केली जाणारी वक्तव्ये पाहता संजय राऊत याना ईडी कधी ना कधी अटक करू शकते असेच चित्र गेल्या काही काळापासून दिसत होते. (Possibility of arrest of Shivsena MP Sanjay Raut) आता ईडी थेट त्यांच्या घरी दाखल झाली असून आजच त्यांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 


शिवसैनिक आक्रमक !

ईडी पथक राऊत यांच्या निवासस्थानी दाखल होताच शिवसैनिकांनी राऊत यांच्या घराबाहेर मोठी गर्दी केली आहे. यात महिला शिवसैनिकांचा देखील समावेश आहे. भाजपकडून त्रास देण्याचा हा प्रकार असून भाजपात प्रवेश केला की ईडी कारवाया थांबतात आणि विरोधकांवर कारवाया होतात हा नवा अलिखित नियम देशात सुरु आहे परंतु भाजपच्या या कृतीला बळी पडणारे संजय राऊत हे नेते नाहीत. अशा प्रतिक्रिया शिवसेनेतून येत आहेत. शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली आहे. 


मरेन पण ----

खा. संजय राऊत यांनी ईडी कारवाई सुरु असताना दोन त्वीट आले असून  "मरेन पण शरण जाणार नाही" असेखासदार संजय राऊत यांनी  ट्विट करून म्हटले आहे. शिवसेना आणि मराठी माणूस लढत राहील. खोटी कारवाई, खोटे पुरावे यामुळे झुकणार नाही तर लढत राहीन असे खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.       



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !