BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० ऑक्टो, २०२२

तलावात पडून आईसह तीन मुलींचा दुर्देवी मृत्यू !

 



शोध न्यूज : तलावात पडून आईसह तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची मोठी घटना समोर आली असून हा अपघात आहे की घातपात ? याबाबत स्पष्टता आली नाही. या घटनेने मात्र सामान्य माणूस हादरून गेला आहे.


जत तालुक्यातील बिळूर येथील एका तलावात आईसह तीन मुलींचे मृतदेह आढळून आले आहेत. बिळूर येथील ३० वर्षे वयाच्या सुनिता माळी या कपडे ज्ञासाठी तलावाकडे गेल्या होत्या. गावाच्या जवळच हा तलाव आहे. कपडे धुण्यासाठी म्हणून गेलेल्या सुनिता परत आल्याच नाहीत परंतु रात्री त्यांच्यासह त्यांच्या तीन मुलींचे मृतदेहच हाती आले आहेत. तलावाच्या पाण्यात बुडून अमृता माळी (वय १३), आश्विनी माळी (वय १० वर्षे) आणि ऐश्वर्या माळी ( वय ७ वर्षे) या त्यांच्या तीन मुलींचा मृत्यू झाला आहे. आई आणि तिच्या तीन मुलींचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने जत तालुक्यासह सांगली जिल्हा हादरला आहे. रात्री उशिरा चार मृतदेह तलावाच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहेत. 


सदर घटना ही नेमकी कशी घडली हे समजण्यास काहीच मार्ग नाही. हा घातपात आहे की अपघात आहे ? याची काहीच माहिती मिळू शकत नाही. या घटनेमागे नेमके काय कारण आहे हे पोलीस तपासात समोर येणार आहेच परंतु आईसह तिच्या तीन लेकरांचा जीव अशा प्रकारे गेल्याने प्रत्येकाचे काळीज गलबलून गेले आहे. (Three girls along with their mother died after falling into the lake)  ७ ते १३ वर्षे वायोगटातील या मुली असून आईचे वय देखील केवळ ३० वर्षाचे होते. पोलिसांनी या घटनेची नोंद करून तातडीने पुढील कार्यवाही आणि घटनेचा तपास सुरु केला आहे.

 

तुकाराम माळी हे गावापासून अडीच किमी  अंतरावर सुतार फाटा येथे राहत असून त्यांच्या घराजवळच त्यांची शेती आहे. या शेतीच्या जवळ लिंगनूर तलाव आहे.  तुकाराम यांची पत्नी सुनिता आणि तीन मुली सकाळपासून बेपत्ता होत्या, त्यामुळे त्यांची शोधाशोध सुरु होती. कुठेच त्यांची माहिती मिळत नसल्यामुळे याबाबत पोलिसांना देखील माहिती देण्यात आली होती. पोलीस, गावकरी आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत असतानाच रात्री त्यांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले. रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !