BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० ऑक्टो, २०२२

शस्त्रक्रियेनंतर पाच वर्षे कात्री महिलेच्या पोटात !



✪ BREAKING NEWS ✪➤ समाजवादी पक्षाचे नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे निधन, काही दिवसांपासून होते आजारी ! ✪➤ ✪➤

शोध न्यूज : डॉक्टरांचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा समोर आला असून शस्त्रक्रिया करताना महिलेच्या पोटात कात्री राहिली आणि पाच वर्षे या कात्रीचा मुक्काम महिलेच्या पोटातच राहिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. 


लहान मुलांनी खेळता खेळता काही गिळले तर अनेकदा ती वस्तू घशात, अन्ननलिकेत अडकून पडते. डॉक्टर अशी वस्तू शस्त्रक्रिया करून बाहेर काढतात. डॉक्टरांना परमेश्वराचे दुसरे रूप मानले जाते पण डॉक्टर जेंव्हा निष्काळजीपणा करतात तेंव्हा मात्र हाच 'परमेश्वर' रुग्णांच्या जीवावर उठल्याचे दिसून येते. जीव वाचविण्यासाठी डॉक्टर रुग्णावर शस्त्रक्रिया करतात पण त्यांची थोडीशी चूक अनकेदा रुग्णाच्या जीवावर देखील बेतू शकते. देवाचे रूप मानले जात असलेल्या डॉक्टर मंडळीत काही धंदेवाईक डॉक्टर तर केवळ नोटा छापण्याचा कारखाना उघडून बसलेले असतात तर काही बोगस डॉक्टर गल्ला भरण्याचा उद्योग करीत असतात त्यामुळे वैद्यकीय पेशाच्या प्रतिमेला मोठा धक्का लागलेला आहे. त्यातच डॉक्टर मंडळींचा बेजबाबदारपणा अधूनमधून उजेडात येवू लागला आहे. असाच एक प्रकार पुन्हा एकदा केरळमध्ये आढळून आला आहे. 


एका डॉक्टरच्या बेजबाबदारपणामुळे एका महिलेला तब्बल पाच वर्षे आपल्या पोटात कात्री ठेवून जगावे लागले आहे आणि पाच वर्षे याच्या वेदना सहन कराव्या लागल्या आहेत. कोझीकोड येथील हर्शिना या महिलेच्या पोटात त्रास जाणवत होता त्यामुळे या महिलेच्या पोटावर २०१७ साली शस्त्रक्रिया कारवाई लागली होती. विशेष म्हणजे या महिलेच्या पोटावर एकदा नव्हे तर दोन वेळा शस्त्रक्रिया करण्याची गरज पडली होती. आधी एका डॉक्टरने ही शस्त्रक्रिया केली आणि नंतर वैद्यकीय महाविद्यालयात दुसरी शस्त्रक्रिया करावी लागली होती. दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया केल्यावर देखील या महिलेच्या पोटातील वेदना कमी होत नव्हत्या त्यामुळे डॉक्टर देखील गोंधळून गेले होते. या वेदना कमी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात अँटिबायोटिक्सचा देखील वापर करण्यात आला.


कितीही औषधोपचार केला तरी या महिलेच्या पोटातील वेदना काही केल्या कमी होत नव्हत्या त्यामुळे डॉक्टर विचारात पडले होते. महिलेला मात्र पोटात प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. काहीही करून तिच्या वेदना थोड्याशाही कमी होत नव्हत्या. पाच वर्षे ती हा त्रास सहन करीत राहिली. अखेर या महिलेने एका खाजगी डॉक्टरकडे धाव घेतली. या डॉक्टरांनी सगळ्या प्रकारच्या तपासण्या केल्या सिटी स्कॅन केले. याचा अहवाल आल्यावर मात्र डॉक्टर पहातच राहिले आणि या महिलेला तर प्रचंड धक्का बसला. कोझीकोड वैद्यकीय महाविद्यालयात पाच वर्षापूर्वी या महिलेवर शस्त्रक्रिया झाली होती तेंव्हापासून एक कात्री महिलेच्या पोटात असल्याचे दिसून आले. पाच वर्षे कात्री  पोटात राहिल्यामुळे गंभीर संसर्ग झाला होता आणि या महिलेला प्रचंड वेदना होत होत्या. 


हा धक्कादायक प्रकार उघडकीस येताच महिला प्रचंड धास्तावली होती. तिने पुन्हा कोझीकोड वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. तेथे महिलेने जाब विचारातच डॉक्टरना घाम सुटला आणि त्यांनी घाइघाइने या महिलेच्या पोटावर आणखी एकदा शस्त्रक्रिया केली आणि पोटातून फोरसेप अर्थात शस्त्रक्रिया करण्यासाठी वापरली जाणारी धातूची कात्री बाहेर काढली. महिलेचा त्रास आता कमी झाला असून तिला रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. डॉक्टरांच्या चुकीमुळे पाच वर्षे या महिलेला जीवघेण्या वेदनांचा सामना करावा लागला होता. डॉक्टरांची थोडीशी बेपर्वाई या महिलेच्या जीवावर उठली होती आणि तब्बल पाच वर्षे पोटात कात्री ठेवून तिला जगावे लागले होते. 


रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर या महिलेने राज्याच्या आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार केली असून वैद्यकीय महाविद्यालयानेही या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ईव्ही गोपी यांनी मात्र या प्रकरणी हात वर केले आहेत. सदर महिलेने दोन वेळा खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रिया केली आहे. (Scissors stay in a woman's stomach for five years) वैद्यकीय महाविद्यालयातील शस्त्रक्रियेचे कोणतेही उपकरण गायब नसल्याचे सुरुवातीच्या तपासणीत दिसून आले आहे तरीही या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.  हा प्रकार कुठल्याही रुग्णालयात झाला असला तरी तो कुठल्या ना कुठल्या डॉक्टरकडूनच झाला आहे हे मात्र नक्की आहे त्यामुळे डॉक्टरांचा निष्काळजीपणा या महिलेला भलताच महाग पडला आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !