BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ ऑक्टो, २०२२

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठार मारण्याची धमकी !

 


शोध न्यूज : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे ठार मारण्याची धमकी आल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक अलर्ट झाली असून राज्यभरात खळबळ उडाली आहे. 


शिवसेनेतून फुटून चाळीस आमदारांसह गुवाहाटीला गेल्यापासून एकनाथ शिंदे हे दररोज कुठल्या न कुठल्या चर्चेत आहेत. काही वादाचे मुद्दे तर काही टीका टिपण्णी सुरूच आहे परंतु आता त्यांना थेट जीवे ठार मारण्याचीच धमकी मिळाली आहे. देशातील अन्य काही राज्यात मुख्यमंत्र्यांना अशा प्रकारच्या धमक्या आलेल्या आहेत परंतु महाराष्ट्रात अशी घटना दुर्मिळ आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी तर आलीच आहे पण आत्मघातकी स्फोट घडवून त्यांना ठार मारण्याचा कट रचण्यात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. (Threat to kill Chief Minister Eknath Shinde) मुख्यमंत्र्यांना ही धमकी मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अधिक दक्ष झाली असून वर्षा निवासस्थानीही सुरक्षा वाढविण्यात आली आहे. 


एकनाथ शिंदे हे पूर्वी नगरविकास मंत्री असतानाही त्यांना माओवाद्यांनी त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती आणि आता आत्मघातकी स्फोट घडवून त्यांना ठार करण्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. त्यांना महिन्याभरापूर्वीच जीवे ठार मारण्याबाबत एक पत्र मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयाला मिळाले होते आणि त्यानंतर धमकी देणारा एक फोन देखील आलेला होता. या घटनेपासूनच सुरक्षा यंत्रणा अधिक दक्ष झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आलेल्या धमकीच्या संदर्भात पोलीस यंत्रणा वेगाने तपास करीत असून मुख्यमंत्री शिंदे यांच्या सुरक्षेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीसारख्या भागात पालकमंत्री म्हणून काम केले आहे. त्यावेळी ते गावागावात जात होते आणि तेथे नक्षली कारवाया करणाऱ्यांचे आत्मसमर्पण केले होते. त्यामुळे त्यांना नक्षलवाद्यांकडून धमक्या येत आहेत. 


सरकारने पीएफआय संघटनेवर बंदी घातली आहे त्यामुळे या धमकीशी या संघटनेचा काही संबंध आहे काय ? याचाही पोलीस तपास करीत असून अन्य सर्व अंगाने या धमकीचा शोध घेतला जात आहे.  


त्यांनी धाडस करू नये !
धमक्यांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण धमक्यांना घाबरत नसल्याचे म्हटले आहे. धमक्यांचे असे अनेक फोन आले आहेत परंतु त्याचा आपल्यावर काही परिणाम होत नाही. आपण जनतेतला माणूस असून जनतेत जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. गृहविभाग योग्य खबरदारी घेत असून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उप मुख्यमंत्री सक्षम आहेत. आपल्याला कुणी काहीही करू शकत नसून कुणी असे धाडस करण्याचा प्रयत्नही करू नये अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली आहे. 


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !