BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ ऑक्टो, २०२२

बाप रे बाप ......! बुटात लपून बसला साप ...! धक्कादायक व्हिडीओ


शोध न्यूज : दारात सोडलेल्या बुटात जाऊन विषारी नाग लपून बसल्याचा अत्यंत धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत असून पावसाळ्याच्या दिवसात साप कोठे आश्रय घेतील हे सांगता येत नाही परंतु यामुळे पावलोपावली धोका मात्र निश्चित असतो. 


पावसाळ्याच्या दिवसात साप, नाग हे अनेक घरात घुसतात आणि हे लक्षात नाही आले तर मोठा धोका अटळ असतो. दारात लावलेल्या दुचाकीच्या विविध भागात विषारी नाग आश्रयाला जाऊन बसलेले असतात आणि ते दंश करण्याची अधिक शक्यता असते. स्कुटीच्या खोपडीत देखील विषारी साप जाऊन बसला असल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पावसाळ्याच्या दिवसात सापांच्या बिळात अथवा वारुळात पाणी जात असल्याने साप बाहेर पडतात. ओढे, नद्यांना पाणी आल्याने नागरी वसाहतीत सापांचे प्रमाण वाढलेले दिसत असते. विषारी नाग नकळत घरात देखील आश्रयाला येतात त्यामुळे त्यांना नकळत धक्का लागला की ते दंश करतात. अशा देखील अनेक घटना घडल्या आहेत. दुचाकीत साप, नाग आश्रय घेतात याचे काही व्हिडीओ समोर आले आहेत पण चक्क बुटात विषारी नाग जाऊन बसल्याचा एक व्हिडीओ काळजाचा ठोका चुकाविल्याशिवाय रहात नाही.


घरात जाताना चप्पल, बूट दारात सोडले जातात आणि बाहेर जाताना लक्ष न देता कुणीही बुटात पाय घालीत असतो. असे करणे किती धोकादायक आहे हे दाखविणारा व्हिडीओ पाहून काळजात धस्स झाल्याशिवाय रहात नाही. ट्वीटर वरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून अशी घटना कुणाच्याही बाबतीत घडू शकते. एका बुटात वेटोळे घालून विषारी नाग आरामात लपून बसलेला आहे. या बुटाकडे पहिले तरी देखील सहजासहजी त्याचे आस्तित्व जाणवत नाही. नकळत या बुटात पाय घालण्याचा प्रयत्न झाला असता तर त्याचा दंश अटळ होता. सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आला त्यामुळे पुढील दुर्घटना टळू शकली आहे. बूट घालायला एक व्यक्ती पुढे सरसावली होती पण त्याचे लक्ष गेले आणि विषारी नाग बुटात पाहून त्याची बोलतीच बंद झाली. बुटातील नाग बाहेर काढण्यासाठी अखेर सर्पमित्राला बोलवावे लागले. 


सर्पमित्र या नागाला बुटातून बाहेर काढण्यासाठी बुटावर हलके ठोके देवू लागतो पण एका क्षणात हा नाग संतापलेल्या अवस्थेत बाहेर तोंड काढून थेट फणा काढू लागतो. हा नाग भलताच चवताळला असल्याचेही दिसत आहे. अशा घटना कुणाच्याही बुटाच्या बाबतीत घडू शकतात त्यामुळे सदैव सावध आणि दक्ष असणे गरजेचे आहे हेच हा व्हिडीओ सांगून जात आहे. थोडेसे दुर्लक्ष करीत हा बूट घालण्याचा प्रयत्न झाला असता तर पुढील अनर्थ हा अटळ होता हे या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे. (A poisonous snake hiding in a shoe, viral video) हा व्हिडीओ पाहताना देखील काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही. अशी वेळ टाळण्यासाठी केवळ दक्षता आणि सावधगिरी हेच पर्याय आहेत. तुम्हीही पहा हा व्हिडीओ ! त्यासाठी खालील लाईनला टच करा !  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !