BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ ऑक्टो, २०२२

सोलापूरच्या आमदारांना जिवे ठार मारण्याची धमकी !

 


शोध न्यूज : सोलापूर येथील भारतीय जनता पक्षाचे आमदार विजयकुमार देशमुख यांना जीवे ठार मारण्याची धमकी मिळाली असून यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

 
भारतीय जनता पक्षाचे सोलापूर येथील आमदार विजयकुमार देशमुख यांना पोस्टाने एक पत्र मिळाले असून सोलापूर येथील माजारेवाडीत राहणाऱ्या मोहम्मद शफी बिराजदार याच्या नावाने हे धमकी पत्र आले आहे. हस्ताक्षरात लिहिलेले हे पत्र आमदार देशमुख यांना मिळाले असून पोलिसांनी याची गंभीर दखल घेतलेली आहे. आमदार देशमुख यांनी हे पत्र पोलिसांकडे दिले असून पोलीस आयुक्त यांची देखील भेट देशमुख यांनी घेतली आहे. पीएफआय या संघटनेकडून हे पत्र आल्याचे दिसत आहे. या संघटनेवर देशभरात एनआयए आणि एसआयटीने छापे टाकले आहेत आणि अनेक सदस्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. या संघटनेच्या सोलापूर येथील एका सदस्यालाही नुकतेच ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्यावर कारवाई करून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलेले आहे. 


आमदार देशमुख यांना आलेल्या या पत्रात धमकीसह अत्यंत पीएफआय संघटनेकडून अत्यंत गलिच्छ भाषेचा वापर करण्यात आला आहे तसेच शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे. हे प्रकरण सोलापूर पोलिसांकडे गेले असून पोलिसांनी त्याचा वेगाने तपास सुरु केला आहे. सोलापूर पोलीस आयुक्त यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून गुन्हे शाखेकडे हा तपास सोपविण्यात आला आहे. पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची भेट घेवून आमदार देशमुख यांनी याबाबतची माहिती दिली आणि सदर धमकीपत्र देखील पोलीसाकडे देण्यात आले आहे. धमकी देणाऱ्याने आपले नाव आणि पत्ताही या पत्रावर दिल्याचे दिसत आहे. 


सदर पत्र नेमके कुठून आले आहे? ते नक्की कुणी पाठवले आहे ? याचा शोध घेणे पोलिसांनी सुरु केले आहे. (PFI threatens to kill Solapur MLA Vijayakumar Deshamukh) मोहम्मद शफी बिराजदार यानेच हे पत्र पाठवले आहे की त्याच्या नावाचा वापर करून अन्य कुणी हा प्रकार केला आहे याबाबतही पोलीस तपासात चौकशी होणार असून त्यानंतर नेमके सत्य बाहेर येणार आहे परंतु जीवे ठार मारण्याच्या या धमकीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे त्याचबरोबर काहीशी चिंता देखील व्यक्त करण्यात येत आहे. 


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !