शोध न्यूज : एका खाजगी कंपनीच्या बसला लागलेल्या आगीत बारापेक्षा अधिक लोकांचा जळून मृत्यू झाला असून या आगीचा व्हिडीओ समोर आला आहे. नाशिक येथे आज ही अत्यंत भयानक घटना घडली.
औरंगाबाद रस्त्यावरील 'हॉटेल मिरची' चौकात आज पहाटे लक्झरी बस आणि टँकर यांच्यात भीषण अपघात झाला आणि या अपघातानंतर प्रवाशांच्या बसने पेट घेतला. काही क्षणात ही आग इतकी भडकली की बस तर जळून खाक झालीच पण बसमधील बारा प्रवासी जळून मृत्युमुखी पडले आणि त्यांचे केवळ सांगाडे उरले. चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळ येथून मुंबईकडे निघालेली असताना नाशिकच्या चौफुली येथे आज पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान ही भयावह घटना घडली. अपघातानंतर बसने पेट घेतला आणि ज्यांना शक्य होते त्यांनी बसमधून खाली उड्या घेतल्या परंतु जे आतच अडकले त्यांचा मात्र जळून मृत्यू झाला. या आगीत बारापेक्षा अधिक प्रवासी मृत्युमुखी पडले असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अपघात झाल्यानंतर ही बस पन्नास साठ फूट घसरत गेली तर टँकर ८० मीटर पुढे गेला आणि यानंतर थांबला. हा अपघात पाहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. यावेळी पोलीस देखील वेळेवर आले नसल्याचे सांगितले जात आहे. अग्निशामक दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी पेटलेली बस विझविण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. अर्ध्या तासांपेक्षा अधिक काळ ही बस विझविण्याचा प्रयत्न सुरूच होता. मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांशिवाय अन्य प्रवाशी देखील भाजून जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहेत. बसमधील प्रवासी झोपेत असतानाच अपघाताची आणि आगीची घटना घडली आहे.
बस पटल्यानंतर प्रवाशानी आपला जीव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आणि काहींनी खिडकीतून खाली उडी मारली. काही प्रवासी गाढ झोपेत होते त्यामुळे सुरुवातीला तर काय घडतेय हेच त्यांच्या लक्षात आले नाही आणि काहींना वेळीच उठून आपला जीव वाचवता आला नाही. काही प्रवाशांनी आपल्या मुलांना घेऊन खिडकीतून खाली उड्या घेतल्या तर काही आपला जीव वाचविण्यासाठी आकांत करीत होते. (Passenger bus caught fire, passengers burnt, video of fire) भल्या पहाटे आकांत, आक्रोश आणि किंकाळ्या ऐकू येत होत्या. भल्या पहाटे अत्यंत भयावह दुर्घटना आज समोर आली आहेया आगीचा थरारक व्हिडीओ समोर आला असून बस पूर्णपणे आगीच्या स्वाधीन झाली असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे.
* व्हिडीओ पाहण्यासाठी (@@@) येथे क्लिक करा !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !