BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ ऑक्टो, २०२२

पंढरपूर पोलिसांनी पकडला लाखोंचा प्रतिबंधित गुटखा !




 शोध न्यूज : पंढरपूर शहर पोलिसांनी पुन्हा एकदा प्रतिबंधित गुटखा पकडला असून एकूण ४४ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करून एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. 


गुटका विक्री, साठा, वाहतूक याला महाराष्ट्र राज्यात बंदी असली तरी शेजारील राज्यातून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा महाराष्ट्रात येताना दिसत असून गेल्या काही महिन्यात तर यात वाढ झाली असल्याचे दिसत आहे. मंगळवेढा, सांगोला पोलिसांनी अलीकडेच लाखोंचा अवैध गुटखा घेवून जाणारी वाहने पकडली आहेत. त्यापूर्वी पंढरपूर पोलीसानीही असा गुटखा पकडला होता आणि आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाहतूक केला जात असलेला गुटखा पकडून कारवाई केली आहे. शेजारच्या राज्यातून अवैध गुटखा प्रवेश करताच मंगळवेढा, सांगोला अथवा पंढरपूर पोलिसांच्या जाळ्यात सापडत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. 


कर्नाटक राज्यातून सांगोला मार्गे पंढरपूर आणि पुढे टेंभुर्णीच्या दिशेने गुटखा घेवून जाणारा एक ट्रक पंढरपूर शहर पोलिसांच्या हाती लागला आहे. अवैध गुटखा घेवून निघालेला ट्रक पोलिसांनी पंढरपूर शहरात सरगम चौकाच्या पुढील बाजूस असलेल्या अहिल्या पुलाजवळ पकडला. पोलिसांनी रिलायंस पेट्रोल पंपाच्या जवळ हा ट्रक (एमएच ०९ सी ए ३६३०) थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित गुटखा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनाला आले. ट्रकमधून हिरा पान मसाला, सुगंधी तंबाखू असे प्रतिबंधित असलेले पदार्थ घेवून निघाल्याचे पोलीस तपासणीत आढळून आले. हिरा पान मसाल्याची १२० पोती तर सुगंधी तंबाखू असलेली ३० पोती पोलिसांना दिसून आली. त्यानुसार पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेतला.


या ट्रकमधून २७ लाख ६० हजार रुपये किमतीचा हिरा पान मसाला, ६ लाख ९० हजार रुपये किमतीची सुगंधित तंबाखू आणि १० लाख रुपये किमतीचा ट्रक असा ४४ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. अन्न व औषध प्रशासनाला याबाबत माहिती देण्यात आली असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. (Pandharpur Police seized banned Gutkha worth lakhs) दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा तेलगाव येथील रहिवासी असलेल्या ट्रकचालक प्रकाश रेवाप्पा शेजाळे याला ताब्यात घेण्यात आले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !