BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२३ सप्टें, २०२२

वृक्ष लागवडीत सव्वा कोटींचा घोटाळा, अधिकाऱ्यांचा अटकपूर्व फेटाळला !





पंढरपूर : वृक्ष लागवड योजनेत सव्वा कोटींचा घोटाळ्याचा आरोप असलेल्या दोन वन अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जमीन आज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. 


शासनाच्या वृक्षलागवड योजनेत खोट्या सह्या, बोगस अंगठे खोटेच मजूर आणि बनावट कागदपत्र याच्या आधारे सव्वा कोटींचा अपहर केल्याप्रकरणी अखेर पंढरपूर पोलिसात आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम नेहमीच वादात अडकला आहे, भारतीय जनता पक्षावर या योज़नेबाबत सतत टीका होत आली आहे. वृक्ष लागवड योजनेसाठी सरकारचा प्रचंड पैसे खर्च होतो पण दरवर्षी लावलेल्या झाडांचे आस्तित्व कुठे दिसत नाही. कागदावरील झाडे आणि प्रत्यक्षात असलेली झाडे यांचा कुठेच ताळमेळ लागत नाही त्यामुळे या योजनेत मोठा गैरप्रकार असल्याचे आरोप होत असतात. 


राज्यातील वृक्ष लागवड कार्यक्रमात असे आरोप  अनेक होत असतात पण त्याची चौकशीही होताना दिसत नाही. पंढरपूर तालुक्यात देखील असाच गैरप्रकार झाल्याची तक्रार आर. आर. पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष दादासाहेब चव्हाण यांनी केली आणि तिचा पाठपुरावा देखील केला. सन २०२९-२० मध्ये महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या वृक्ष लागवड उपक्रमात सव्वा कोटींचा अपहार करण्यात आल्याचा चव्हाण  यांचा आरोप आहे. खोटेच मजूर, खोटे अंगठे आणि सह्या तसेच खोटी कागदपत्रे तयार करून वृक्ष लागवड योजनेत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा अपहार केला असल्याची दादासाहेब चव्हाण यांची तक्रार आहे.  न्यायालयाच्या आदेशानंतर तत्कालीन विभागीय वन अधिकारी सुवर्णा माने, मनिषा पाटील,  संतोष महालिंग नवघरे, वन मजूर  किशोर सुभाष अहिरे वनमजूर, वनपाल रुकेश कांबळे, बबन अंकुश गायकवाड वनपाल, समाधान पाटील आणि वनमजूर आबंन्ना सद्राम जेऊरे यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस अटक करतील या भीतीने यातील वन अधिकारी संतोष महालिंग नवघरे, आंबन्ना सद्राम जेऊरे  यांनी पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जमीन मिलाविण्यासाठी धाव घेतली होती. या अर्जावर सुनावणी होऊन आज न्यायालयाने दोघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत त्यामुळे आता त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम राहिली आहे. (Tree plantation scam, officers Anticipatory bail rejected) संबंधित प्रकरण गंभीर स्वरूपाचे व शासकीय अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात शासकीय रकमेचा अपहार केल्याचे दिसून येत असल्याने संबंधित वनाधिकारी संतोष महालिंग नवघरे वन क्षेत्रपाल व आंबन्ना सद्राम जेऊरे या दोघांनचे जमीन अर्ज आज  फेटाळून लावले आहेत.


सामाजिक वनीकरण विभागाच्या तीन कर्मचाऱ्यांसह आठ जणांनी मिळून खोटी कागदपत्रे तयार करून बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने १ कोटी २५ लाख रुपये हडप केले असल्याबाबत आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील चौकशी करण्याचे आदेश पंढरपूर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांनी दिले होते त्यानुसार पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. राज्य शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाने ३३ कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम  २०१९-२० मध्ये राबविला होता. या उपक्रमांतर्गत पंढरपूर शहर आणि तालुक्यात प्रमुख रस्ते, शासकीय कार्यालये आदी ठिकाणी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले होते. 


हा कार्यक्रम राबविताना प्रत्यक्षात शासनाच्या नियमाप्रमाणे हा उपक्रम राबविण्यात आला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.  सदर उपक्रम राबविताना तत्कालीन वनरक्षक संतोष नवघरे, वनक्षेत्रपाल किशोर अहिरे, वनमजूर अंबन्ना जेऊरे यांनी संगनमत करून नियोजनाच्या अर्धवट झाडांची लागवड केली. या कामांसाठी काही मजूर दाखवले पण प्रत्यक्षात हे मजूर कामावर नव्हतेच परंतु त्यांच्या नावाने हा अपघात करण्यात आल्याचा आरोप आहे. अभिजित गायकवाड, प्रवीण जाधव, लक्ष्मण साळवी, जयसिंग नागणे, अनिल गायकवाड, मयूर गायकवाड, राणी गायकवाड, प्रताप गायकवाड, वनिता दानवले, स्वाती दानवले यांना बनावट मजूर दाखवून त्यांच्या नावाने खोटी कागदपत्रे तयार करण्यात आली आणि प्रत्यक्षात त्यांच्या सह्या न घेताना बनावट अंगठे उठवून, बोगस सह्या करून सव्वा कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप दादासाहेब चव्हाण यांनी केला आहे.


चव्हाण यांनी पोलिसात तक्रार करण्याचा प्रयत्न केला परंतु तेथे तक्रार दाखल केली गेली नसल्याचे त्यांनी न्यायालयात धाव घेतली.  पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करून त्याचा अहवाल सादर करण्याचा आदेश पोलिसांना दिला.  न्यायालयाच्या आदेशानुसार पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून झाडांच्या लागवडीत तब्ब्ल सव्वा कोटींचा अपघात केल्याचा आरोप असल्याने खळबळ उडाली होती. आता न्यायालयाने दोघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !