BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ सप्टें, २०२२

आ. शहाजीबापू पाटील म्हणजे थापेबाज सोंगाड्या !

 



शोध न्यूज : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील म्हणजे थापेबाज सोंगाड्या असल्याचे सांगून शिवसेनेचे प्रा. लक्ष्मण हाके यांनी पुन्हा एकदा आ. शहाजीबापू पाटील यांना डिवचले आहे.


शिवसेनेचे नेते आ. शहाजीबापू पाटील यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि शहाजीबापू देखील त्याच तोडीचे प्रत्युत्तर देत आहेत. सुरुवातीपासून शहाजीबापू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बाजू उचलून धरली आहे परंतु त्यांना पहिल्या विस्तारात मंत्रीपद देण्यात आले नाही. यामुळे विरोधकांनी जोरदार टीका देखील केली. राष्ट्रवादीचे नेते देखील शहाजीबापू यांच्यावर सडकून टीका करीत आहेत. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी शहजीबापुना 'सोंगाड्या' म्हटले होते आणि आता पुन्हा शिवसेनेच्या लक्षमण हाके यांनी त्यांना डिवचले आहे. 


शहाजीबापू पाटील हे निव्वळ थापेबाज सोंगाड्या किंवा सोंगाड्या कीर्तनकार असतो तसे आहे असे डिवचत आ. पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेची एक महत्वाची बैठक आज पंढरपूर येथे झाली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शहाजीबापू यांनाच टार्गेट केले. शहाजीबापू पाटील हे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सेलेब्रेटी म्हणून जात आहेत, त्यांच्या भाषणात सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नाविषयी, तरुणांच्या रोजगाराविषयी ते बोलत नाहीत. भावनिक बोलत कधी डोळ्यातून अश्रू काढतात, कधी ते माझ्या बायकोला साडी मिळाली नाही म्हणतात.अशी खिल्लीही त्यांनी उडवली. 


सांगोला तालुक्याला डाळींबाची ओळख होती पण आता तालुक्यातील ८० टक्के डाळिंब शेती उद्धवस्त झाली आहे. ही शेती वाचविण्यासाठी शहाजीबापू पाटील यांनी काय केले ? सामान्य जनतेसाठी गेल्या अडीच वर्षात एकही प्रश्न विधानसभेत विचारला नाही. इंदापूरमध्ये जाऊन हर्षवर्धन पाटील यांना दहा हजार मताधिक्क्याने त्यांना निवडून आणू असे आ. पाटील म्हणाले आहेत. परंतु शहाजीबापू, तुम्हीच पाचशे, सातशे मतांनी निवडून येता आणि तुम्ही हर्षवर्धन पाटील यांना दहा हजार मतांनी निवडून आणणार? असा सवालही त्यांनी केला. 


'आमदार शहाजीबापू पाटील हे महाराष्ट्रातील जेवढ्या विधानसभा मतदारसंघात जातील तिथला आमदार दहा हजार मतांपेक्षा अधिक मतांनी पराभूत होईल हे माझे वाक्य आज तुम्ही लिहून ठेवा' असे देखील हाके म्हणाले आहेत. शिवसेनेने शहाजीबापू पाटील यांना सांगोल्यात शह देण्यासाठी मात्तबर 'मल्ल'  निवडलेला आहे. ओबीसी मोर्चाचे नेते लक्ष्मण हाके हे  शिवसेनेत दाखल झाले आहेत आणि त्यांनी आपली रणनीती सुरु देखील केली आहे. शहाजीबापू यांना टार्गेट करूनच हाके आज बोलताना दिसले.


शिवसेनेतून चाळीस आमदार फुटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले असले तरी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू हे शिवसेनेच्या 'टार्गेट' वर आले आहेत.शिवसेनेशी गद्दारी करणारे आता शिवसेनेच्या हिटलिस्टवर असून या चाळीस आमदारांना आगामी निवडणुकीत चारी मुंड्या चीत करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली असून यात ग्रामीण महाराष्ट्रातील शहाजीबापू पाटील, तानाजी सावंत हे पहिल्या यादीत आलेले आहेत. सांगोल्यात शिवसेनेचे फारसे प्राबल्य नसले तरी किरकोळ मतांनी विजयी होणाऱ्या शहाजीबापूना शिवसेनेचा रोष महागात पडू शकतो. 


लक्ष्मण हाके हे सांगोला तालुक्यातील रहिवाशी असून उच्चशिक्षित देखील आहेत. त्यांनी आता आपल्या हातात शिवबंधन बांधले असून एका दमदार तयारीला लागले आहेत. (
MLA Shahajibapu Patil is a Songadya, Criticism of Laxman Hake) आ. शहाजीबापू पाटील किंवा तानाजी सावंत हे किरकोळ मतांनी निवडून आलेले आमदार आहेत, ग्रामीण भागातील अठरा पगड जातीजमाती वाड्यावस्त्यावरून लोकांना भूलथापा देवून आणि पैशाची पेरणी करून ही माणसं निवडून आलेली आहेत. त्यांना घरी बसविण्यासाठीच मी शिवसेनेत आहे" असे लक्ष्मण हाके यांनी शिवसेनेत दाखल होताच म्हटले होते.


सांगोल्यातून लढणार  !

सांगोला मतदार संघातून प्रा. हाके हे शिवसेनेच्या तिकिटावर लढणार हे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ ते विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात निवडणुकीत उतरणार आहेत. पक्षाने दिलेली जबाबदारी आपण समर्थपणे पेलणार आणि पक्षाने संधी दिली तर आपान शहाजीबापू पाटील यांच्या विरोधात मजबूतपणे लढणार असल्याचे त्यांनी या आधीच स्पष्ट केले आहे. 


  • अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !