BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ जाने, २०२३

'त्याने' काढली चक्क आपलीच बनावट अंत्ययात्रा !


शोध न्यूज : 'त्याने' चक्क आपलीच बनावट अंत्ययात्रा काढली आणि अंत्यसंस्कार करण्याची तयारी पूर्ण झाल्यावर विधी सुरु असतानाच तो चक्क उठून बसल्याची अफलातून घटना सम्रोर आली आहे.


कुणाच्या डोक्यात कधी काय येईल आणि कोण कुणाची कशी परीक्षा घेईल हे काही सांगता येत नाही. जवळच्या माणसाची परीक्षा घेण्याची अनेकांना सवय असते परंतु त्यालाही काही मर्यादा असते. आपल्या मृत्यूनंतर आपल्या कुटुंबाचे काय होणार ? याची चिंता अनेकांना असते आणि ते साहजिकही आहे पण आपल्या मृत्युनंतर कोण कोण येतेय आणि नेमकी काय परिस्थिती होतेय हे पाहण्याचीही उत्सुकता एका पट्ट्याला लागली आणि त्याने चक्क मृत्यूचा आभास निर्माण करीत सगळे चित्र जिवंतपणी अनुभवले आहे. अंत्यसंस्कार करण्याच्या वेळीच अनेक मृत व्यक्ती उठून बसल्याचे काही किस्से आधीही समोर आले आहेत. मृत व्यक्ती जिवंत झाल्यावर होणारा आनंद काही वेगळाच असतो पण इथे मात्र तसे घडले नाही. ब्राझील मधला 'तो' अंतिम संस्काराच्या आधीच उठून बसला पण त्याने केलेला खुलासा ऐकून प्रत्येकाला संताप आला आहे. 


 बाल्टझार लेमोस नावाच्या या व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याची अंत्ययात्रा देखील काढण्यात आली. अंत्यसंस्कार करण्याची सगळी तयारी झाली आणि विधी सुरु असतानाच तो उठून बसला आणि सगळ्यांकडे पाहू लागला. वास्तविक तो मेलेलाच नव्हता आणि त्याने आपल्याच मृत्यूचे खोटे नाटक रचले होते. त्याच्या मृत्यूची बातमी सगळीकडे पसरली तेंव्हा अनेकानी दु:ख व्यक्त केले तर अनेकजण त्याच्या अंत्ययात्रेत देखील सहभागी झाले. मोठ्या संख्येने लोक जमले आणि त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली. अंतिम संस्कार करण्याची तयारी पूर्ण झाली आणि विधी सुरु असतानाच तो चक्क उठून बसला. सुरुवातीला अनेकांना हा चमत्कार देखील वाटला आणि जमलेले लोक सुखावले परंतु सत्य परिस्थिती समोर आल्यावर मात्र अनेकांच्या रागाचा पारा भलताच वर चढला. हा सगळा प्रकार खोटा होता, त्याचा मृत्यू, अंत्ययात्रा हे सगळेच बनावट असल्याची माहिती अंत्यविधीला आलेल्या लोकांना समजली तेंव्हा संताप व्यक्त होत राहिला. 


 बाल्टझार लेमोस या व्यक्तीनेच याबाबत खुलासा करून लोकांना माहिती दिली. आपल्या मृत्युनंतर किती लोक दु:ख व्यक्त करतील, किती लोक आपल्या अंत्ययात्रेला आणि अंत्यसंस्काराला उपस्थित राहतील हे त्याला पहायचे होते. कुटुंब आणि आपल्याच मित्र मैत्रिणीची परीक्षा त्याला घ्यावयाची होती म्हणून त्यानेच आपल्या मृत्यूची बातमी पसरवली आणि खोट्या मृत्यूची खोटी अंत्ययात्रा देखील काढली. लोकांनी देखील जिवंत व्यक्तीच्या अंत्ययात्रेचा अनुभव घेतला. (Fake death, fake funeral. A strange way to test family and people) त्याने लोकांना याची माहिती दिली तेंव्हा मात्र अनेकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते तर बहुतेकांनी या सगळ्या खोट्या प्रकाराबाबत प्रचंड संताप व्यक्त केला.



 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !