BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

११ ऑग, २०२२

नळावर गेलेल्या महिलेचा शॉक लागून मृत्यू !

 



मोहोळ : पाणी आणण्यासाठी नळावर गेलेल्या महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना मोहोळ तालुक्यातील पाटकूल येथे आज घडली असून रक्षाबंधनाच्या दिवशीच ही दुर्घटना घडली आहे. 


विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याचे प्रमाण अलीकडे वाढताना दिसत असून थोडेसे दुर्लक्ष प्राणावर बेतू शकते. परंतु कामाच्या घाई गडबडीत दुर्लक्ष होते आणि जीवाला मुकावे लागते. पाटकूल येथील एका महिलेच्या बाबतीत देखील असेच घडले आणि मृत्यू ओढवला आहे.  २७ वर्षीय दिपाली अनिल तांबवे या धुणे धुण्यासाठी आणि भांडी घासण्यासाठी पाणी आणण्यासाठी घराच्या समोर असलेल्या नळावर गेल्या होत्या.  या नळाला विद्युत मोटार जोडण्यात आलेली होती.  दिपाली तांबवे यांचा हात चुकून मोटारीच्या वायरला लागला आणि त्यांना विजेचा जोरदार धक्का बसला. 


✪ ✪ ब्रेकिंग ✪. ✪➤ वीर आणि उजनी धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवला, नदीकाठी सावधानतेचा इशारा ! भीमा नदीची पातळी वाढणार ! ✪➤! ✪➤ !✪➤➤ !!✪ ✪➤➤


विजेचा धक्का बसताच त्यांना तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना तपासून पहिले पण उपचाराच्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. याबाबत दीपक सुनील तांबवे यांनी मोहोळ पोलिसात खबर दिली आहे. (Woman dies due to electric shock) आज रक्षाबंधनाच्या दिवशीच ही दुर्घटना घडल्यामुळे पाटकुल गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने गावकऱ्यांना धक्का बसला आहे.    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !