BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२२ ऑग, २०२२

पंढरीत तरुणाचा खून ! दगड बांधून विहिरीत टाकले !



 BREAKING NEWS 



पंढरपूर : पंढरीतील एका तरुणाचा खून झाल्याचे आढळून आले असून सदर तरुणाचा मृतदेह एका विहिरीत निदर्शनास आला आहे. खुनाच्या या घटनेने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 

पंढरपूर तालुक्यातील वाखरी गावच्या हद्दीत याकुब शेख यांच्या शेतातील एका विहिरीत पंढरपूर तालुक्यातील एका तरुणाचा मृतदेह आढळला असून त्याच्या कमरेला केशरी रंगाच्या नायलॉन दोरीने दगड बांधून विहिरीत टाकून दिल्याचे दिसून येत आहे. एक  मोठा दगड बांधून या २५ वर्षे वयाच्या तरुणाला विहिरीत फेकून दिल्याचे दिसून आले. ही माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले आणि मृतदेहाची पाहणी केली तसेच त्याची ओळख देखील पटविण्यात आली. 


लखन सुनील गांडुळे असे या तरुणाचे नाव असून तो पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथील राहणारा आहे.  घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि अधिक चौकशी आणि तपास सुरु करण्यात आला. शेतमालक आपली शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले असता ते या विहिरीच्या बाजूला गेले. तेथे एक चप्पल दिसल्यामुळे त्यांनी विहिरीत पहिले असता हा प्रकार उघडकीस आल्याची माहिती मिळत आ.हे (Murder! A stone was tied and thrown into the well) सदर घटनेबाबत पंढरपूर शहरात चर्चा सुरु झाली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत. 


सदर विहिरीत पाणी अत्यंत कमी होते त्यामुळे ही घटना सहज उघडकीस आली. मृताची ओळख पटली असल्याने पोलिसांनी जलद तपास सुरु केला असून सीसीटीव्ही फुटेज देखील पडताळण्यात येत आहे. या घटनेतील आरोपींच्या मुसक्या लवकर आवळल्या जातील असा पोलिसांना विश्वास आहे. या तरुणाची हत्या नेमकी कुणी आणि कशामुळे केली याचा शोध पोलीस घेत आहेत.  पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथक देखील नेमलेले आहे.  मयताचा भाऊ शंभू सुनील गांडुळे यांनी याबाबतची फिर्याद पोलिसात दिली आहे .


दोन्ही हात बांधलेले !

मृतदेहाचे दोन्ही हात दोरीने बांधलेले असून कमरेला मोठा अवजड दगड बांधण्यात आला आहे. अज्ञात आरोपीने पुरावा नाहीसा करण्यासाठी मृतदेह विहिरीत टाकला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !