वालचंदनगर : अनेक गद्दार शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटात सहभागी होत असताना इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील एका शिक्षकाने नोकरीवर लाथ मारून उद्धव ठाकरे यांना समर्थन दिले आहे.
शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाळीस आमदार बाहेर पडले आणि भाजपशी जवळीक साधत सत्ता प्राप्त केली. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना दगा झाल्याने महाराष्ट्र हळहळला. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेले काम महाराष्ट्राला चांगलेच भावलेले आहे त्यामुळे सर्वसामन्य माणूस देखील अस्वस्थ झाला. उद्धव ठाकरे यांच्याबाबत असे घडायला नको होत्या अशा प्रतिक्रिया सामान्य जनतेतून देखील उमटत आहेत. राजकीय प्रतिक्रिया येणे स्वाभाविक असले तरी सामान्य आणि राजकारणाशी कसलाही संबंध नसलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया उमटत असून सहज होत असलेल्या चर्चेत देखील ठाकरे यांना सहानुभूती मिळत आहे.
सोशल मीडियावर तर जनता अत्यंत कडक शब्दात आपला संताप आणि नाराजी व्यक्त करीत आहेत. शिवसेनेने सगळे काही दिले असतानाही शिवसेना फोडण्याचे काम झाले असताना सामान्य माणूस मात्र काही मिळाले नसले तरी देखील शिवसेनेच्या बाजूने खंबीर उभा राहिला असल्याचे दिसत आहे. आजवर कुठल्याही मुख्यमंत्र्यांना एवढी लोकप्रियता मिळाल्याचे कधी दिसून आलेले नव्हते. इंदापूर तालुक्यातील तर एका शिक्षकाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्यासाठी थेट नोकरी सोडली आहे.
शिवसनेने ज्यांना विविध पदे दिली, ज्यांना कुणी विचारत देखील नव्हते त्यांना सन्मानाचे जीवन दिले आणि कित्येकजन शिवसेनेच्या नावावर आणि पदांवर मोठे झाले पण शिवसेना संकटात असताना पक्षाशी गद्दारी करून बाहेर पडले. संकटात सापडलेल्या शिवसेनेला अधिकच अडचणीत आणण्याचे काम त्यांनी केले. सामान्य माणूस आणि सच्चा शिवसैनिक मात्र आपल्यासोबतच असल्याचे शिवसेना सांगत आहे आणि त्याचा सर्वात मोठा पुरावा इंदापूर तालुक्यातील शिक्षकाच्या निमित्ताने समोर आला आहे. शिवसेना सोडून जाणारे जसे दिसत आहेत तसे या संकटाच्या काळात देखील शिवसेनेत सहभागी होणारेही वाढू लागल्याचे दिसत आहे. यातच वालचंदनगर येथील एका शिक्षकाने गद्दारांच्या डोळ्यात झणझणीत अंजनच घातले आहे.
वालचंदनगर पाठशाळा क्र. ३ मध्ये कार्यरत असलेले शिक्षक दीपक पोपट खरात हे गेल्या २० वर्षे सहा महिन्यांपासून शिक्षक आहेत. त्यांना भलेमोठ्ठे वेतनही मिळत आहे. तरीही त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून राजीनाम्याचे कारण देखील अत्यंत स्पष्टपणे त्यांनी नमूद केले आहे. "शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाठींबा दर्शवून शिवसेना पक्ष संघटनेचे पूर्णवेळ काम करणे या कारणास्तव मी माझ्या नोकरीचा राजीनामा स्वेच्छेने देत आहे" असा मजकूर लिहून शिक्षक दीपक खरात यांनी आपला राजीनामा दिला आहे. एकीकडे गद्दारांची फौज दिसत असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणारे सामन्य लोक देखील समोर येत आहेत. (Teacher quits job for Uddhav Thackeray) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राज्यातून प्रचंड सहानुभूती मिळत असताना शिक्षकाच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !