सोलापूर : कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता सोलापूर जिल्ह्यात कोरोन बळींची संख्या देखील वाढू लागली असल्याने अधिक चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
दिवसभरात आणखी दोघांचा या आजाराने बळी घेतला असून, गेल्या दोन दिवसात बळींची संख्या ३ झाली. तर आत्तापर्यंत गेलेल्या बळींची संख्या १५०८ वर गेली आहे. महापालिका प्रशासनाने बुधवारी जारी केलेल्या कोरोना चाचणी अहवालात कालच्या मोरारजी पेठ परिसरातील यश नगरातील बळी गेलेल्या ४२ वर्षीय रुग्णाच्यानंतर आता शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एक ४० वर्षीय तर दुसरा ६० वर्षीय पुरुषाचा कोरोनाने बळी गेला आहे. पण हे दोन्ही रुग्ण शासकीय रुग्णालय परिसरात आढळलेले बेवारस आणि अनोळखी असल्याची नोंद या अहवालात घेण्यात आली आहे.
मंगळवारी दिवसभरात २५२ संशयित रुग्णांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या.यामध्ये १० पुरुष आणि ११ महिला असे २१ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. अँटीजेन चाचणीत ६ तर आरटीपीसीआर चाचणी १५ जण शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या १४३ इतकी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. या रुग्णांसह झाली आहे. यामधील ३२ रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल असून उर्वरित १११ रुग्ण घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत. ही संख्या रोज वाढताना दिसू लागली आहे.
डेंग्युचेही रुग्ण !
शहरातील होटगी रस्त्यावरील मंत्रीचंडक इस्टेट या भागासह विविध परिसरात डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण देखील वाढत असल्याने महापालिका आरोग्य विभागाने विविध उपयोजना हाती घेतले आहेत. शहरातील झोपडपट्टी परिसरासह इतर सर्वच भागांमध्ये महापालिका वैद्यकीय विभागातील विशेष पथके घरोघरी जाऊन सध्या सर्व्हे करीत आहेत. ज्या भागात मलेरिया, चिकून गुनिया, डेंग्यूचे रुग्ण आणि संशयित आढळून येत आहेत. त्या परिसरात औषध फवारणी आणि स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. गेल्या महिनाभरात डेंग्यूचे रुग्ण वाढले असून ५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर अनेक संशयित रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. याचा अहवाल येणे बाकी असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. बसवराज लोहारे यांनी सांगितले. (Increase in corona deaths in Solapur district) गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने सोलापूर जिल्ह्यातही चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !