पुणे : "उद्धव साहेब, चूक झाली, मला फसवून शिंदे गटात नेलेय !" असे एक पत्रच शिंदे गटात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिले असून यामुळे नक्की काय चाललेय यावरच प्रकाश पडला आहे.
शिवसेनेतून ४० आमदारांचा एक गट फुटून भाजपच्या सोबत गेला आणि सत्ता प्राप्त केली. फुटीर आमदारांचा गट सुरत आणि पुढे गुवाहाटी येथे गेल्यावर देखील काही आमदारांना फसवून नेले असल्याचे आरोप झाले होते आणि त्यातील दोन आमदार तेथून परत देखील आले होते. ईडी, सीबीआय च्या भीतीने आमदार शिवसेनेतून फुटून गेल्याचे आरोप होत राहिले. राज्यात शिंदे गटाने भाजपशी हात मिळवणी करून सत्ता आणि मुख्यमंत्रीपद देखील मिळवले आणि आता हा गट शिवसेनेवरच मालकी सांगू लागला आहे. सर्वोच्च न्यायालयात अजून बरेच काही घडायचे आहे परंतु शिवसेना पक्षातील अनेक पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेनेतून आउट गोईंग तर शिंदे गटात इनकमिंग सुरु असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे त्यामुळे शिवसेनेचे आता काय होणार असा प्रश्न काहीना पडला आहे.
शिवसेनेला अनेक तडाखे बसले आहेत परंतु शिवसेना त्यातून सावरली आहे आणि पुन्हा नव्या जोमाने उभा देखील राहिली आहे. यावेळी देखील तसेच होईल असा विश्वास राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत. शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदार अथवा नेत्यांची पुढे काय अवस्था होते याची साक्ष इतिहास देतच आहे शिवाय फुटलेल्या आमदारांना शिवसैनिकांचा मोठा रोष देखील पत्करावा लागला आहे. अशातच शिंदे गटात दाखल होत असलेली संख्या मोठी दिसत असताना दुसरी बाजूही समोर येताना दिसत आहे. आपली इच्छा नसताना शिंदे गटात दाखल होण्यास भाग पाडले जात असल्याचे काही आरोप झाले आणि आता पुण्याच्या एका विभाग प्रमुखाने तर लिखित स्वरुपात पत्र देवून वस्तुस्थिती राज्यासमोर आणली आहे.
पुण्यातील शिवसेना विभाग प्रमुख (झोपडपट्टी सेना) राजू तम्मा विटकर हे शिंदे गटात दाखल झाले होते परंतु त्यांनी आता थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच पत्र देवून आपला बळी गेला आहे, आपली फसवणूक झाली आहे, काही लोकांनी आपणास नकळत शिंदे गटात सहभागी करून घेतले आहे परंतु आपण पुन्हा शिवसेना पक्षात सहभागी होत असून झालेल्या चुकीबाबत विटकर यांनी माफी देखील मागितली आहे.
शिवसेनेतून शिंदे गटात दाखल झालेले शिवसेनेचे पदाधिकारी एवढ्या लवकर शिंदे गटाकडे पाठ फिरवून परत शिवसेनेत दाखल होत असल्याने भविष्यात काय घडणार आहे याचे संकेतच मिळू लागले आहेत. असे किती पदाधिकारी 'नकळत' शिंदे गटात गेले आहेत हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Incoming in Shiv Sena starts immediately)सच्चा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक फुटून बाहेर जाऊच शकत नाही असे शिवसेंतून ठामपणे सांगितले जाऊ लागले असताना लगेच परतीची वाट देखील धरली जाऊ लागली आहे हेच विटकर यांच्या पत्राने दर्शविले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !