सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे माजी सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांची एक व्हिडीओ आणि एक ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आता पुण्यात देखील देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख हे अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत. सांगोल्यातील कथित गोळीबार प्रकरण काही वर्षांपूर्वी चांगलेच गाजले होते आणि आजही लोक तो प्रकार विसरले नाहीत. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर आंदोलनावेळी देखील ते वादात सापडले होते शिवाय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी घातलेली हुज्जत देखील चर्चेची ठरली होती. त्यानंतर आता धक्कादायक बाब समोर आली आणि राज्यभर याचे पडसाद उमटत आहेत. एका महिलेने देशमुख यांच्यावर मोठा आणि गंभीर आरोप केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि लाखो लोकांनी तो पाहून तोंडात बोट घातले. या व्हिडीओत देशमुख हे एका खोलीत बेडवर बसलेले आहेत आणि सदर महिला त्यांच्याकडे बोट दाखवत याने आपली फसवणूक केल्याचे सांगत आहे. हे सांगताना सदर महीला रडत असल्याचेही जाणवत आहे.
पक्षीय पातळीवर कारवाई झाली असली तरी पोलीस कारवाईचे काय ? असा सवाल उपस्थित होऊ लागला होता आणि आता पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात श्रीकांत देशमुख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाचे आमिष दाखवून श्रीकांत देशमुख याने आपल्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची तक्रार सदर महिलेने पोलिसात दाखल केली आणि या तक्रारीनुसार पोलिसांनी देशमुख विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड विधान कलम ७६, ७७, ५०४, ५०६ अन्वये दाखल करण्यात आलेला गुन्हा सोलापूरला वर्ग करण्यात आला आहे. (Case file against Shrikant Deshmukh)त्यामुळे या गाजलेल्या गुन्ह्याचा तपास आता सोलापूर पोलीस करणार आहेत.
गुंगीचे औषध ?
महिलेने आपल्याला ग्रीन टी मधून गुंगीचे औषध दिले असल्याचे श्रीकांत देशमुख यांनी या आधीच सांगितले आहे परंतु आता हे प्रकरण पोलीस तपासाचे बनले आहे त्यामुळे पोलीस तपासातून काय काय बाहेर येतेय याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !