BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ जुलै, २०२२

पंढरपूरजवळ अपघातात दोघांचा जागीच मृत्यू !

 



पंढरपूर : पंढरपूर- सांगोला मार्गावर पुन्हा एक अपघात झाला असून या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून स्विफ्ट गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. 


पंढरपूर - सांगोला रस्ता रुंद आणि सिमेंटचा झाल्यापासून हा मार्ग मृत्यूचा महामार्ग बनला आहे. गेल्या दोन वर्षात या रस्त्यावर पंढरपूर तर सांगोला दरम्यान अनेक अपघात झाले आहेत आणि कित्येकांचे प्राण गेले आहेत. या रस्त्यावरील काही ठिकाणे तर अपघाताचे स्पॉट बनले आहेत. अत्यंत भरधाव वेगाने आणि तितक्याच बेपर्वाईने वाहने चालवली जात आहेत आणि स्वत:सह इतरांचे देखील प्राण घेतले जात आहेत. सतत अपघात होत असताना आणि अपघातात मृत्यू होत असताना वाहनचालक याकडे गंभीरपणे पाहत  नसल्याने हे अपघात होत असतात आणि आज पुन्हा एक भीषण अपघात होऊन सांगोला तालुक्यातील वासूद येथील दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 


पंढरपूर ते खर्डी दरम्यान मठवस्तीजवळ आजचा अपघात झाला आहे. पंढरपूरकडून सांगोल्याकडे निघालेल्या स्विफ्ट कारला  (एम एच ४५ एन ५७०४)  भरधाव वेगात येत असलेल्या ट्रकने जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. स्विफ्ट गाडी ही पंढरपूरकडून सांगोल्याकडे जात होती तर ट्रक हा सांगोल्याकडून पंढरपूरकडे येत होता. सदर दोन्ही वाहने मठ वस्तीच्या जवळ आली असता जोराची धडक झाली.  स्विफ्ट कारचा या अपघातात चक्काचूर झाला असून स्विफ्टमधील सुशांत सुभाष केदार (वय २२) आणि शनिदेव प्रकाश केदार (वय २०) हे दोन तरुण ठार झाले आहेत.


अपघाताची घटना घडताच आजूबाजूचे लोक मदतीसाठी धावले. या अपघातात सांगोला तालुक्यातील वासूद येथील दोन तरुण मृत्युमुखी पडल्याने वासूद गावावर शोककळा पसरली असून केदार कुटुंबाला तर मोठा धक्का बसला आहे.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !