BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ जून, २०२२

राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर झाडल्या दोन गोळ्या !




उस्मानाबाद : राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि  सरपंच नितीन बिक्कड यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने दोन गोळ्या झाडल्या असून या हल्ल्याने उस्मानाबाद जिल्ह्यात खळबळ उडवली आहे.


उस्मानाबाद युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष तसेच फक्राबाद ग्रामपंचायतीचे सरपंच नितीन बक्कड यांच्यावर काल रात्री अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर दोन गोळ्या झाडल्या यातील एक गोळी गाडीच्या समोरच्या काचेवर लागली तर दुसरी गोळी ड्रायव्हरच्या सीटच्या बाजूला लागली. दोन गोळ्या झाडल्या गेल्या पण सुदैवाने गाडीतील सगळे बचावले आहेत. बिक्क्ड यांच्यावरील हा हल्ला कुणी आणि कशासाठी केला ? (Unidentified persons shot at the NCP leader) याची माहिती मिळू शकली नसली तरी पोलीस सतर्क झाले असून अज्ञात हल्लेखोरांचा तपास वेगाने केला जात आहे. 


जिल्ह्यातील पारा - फक्राबाद रोडवर हा प्रकार घडला असून नितीन बिक्कड हे गाडीतून निघाले असताना ही घटना घडली. वाशी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात तरुणांनी गाडीची काच खाली घ्यायला सांगितली आणि दुसऱ्या हल्लेखोराने गोळ्या झाडल्या आहेत.  फक्राबाद शिवारातील येताळ येथे बिक्कड पोहोचले असताना अचानक हा थरार सुरु झाला. दोन्ही हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावलेले होते. गोळीबार होताच बिक्कड यांनी वेगाने गाडी पळवली पण तरीही हल्लेखोराने मागच्या बाजूने आणखी एक गोळी झाडली परंतु सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !