BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जून, २०२२

बाल कामगार ठेवल्यास थेट होणार कारवाई !


सोलापूर : बालकामगार ठेवण्यावर नियमानुसार बंदी असून सोलापूर जिल्ह्यात असे कामगार ठेवले असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आला आहे त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.


बाल कामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ अन्वये कुठल्याही कामासाठी बाल कामगार ठेवता येत  नाहीत परंतु बाजारात हा कायदा कागदावरच ठेवला जातो आणि जिकडे तिकडे बाल कामगार काम करतांना दिसतात. छोट्या मोठ्या हॉटेलपासून वीट भट्टीपर्यंत सगळीकडे लहान मुले काम करताना दिसतात. कमी रोजगारात लहान मुले काम करीत असतात त्यामुळे व्यावसायिक मंडळीना बाल कामगार हवे असतात.  हॉटेलमध्ये टेबल पुसणे, कपबशी, प्लेट्स उचलणे, भांडी धुणे अशा कामासाठी लहान मुले ठेवली असल्याचे अनेक ठिकाणी दिसते. दुकाने, गॅरेज  अशा ठिकाणी हमखास लहान मुलांचे हात राबताना दिसतात तर वीट भट्टीसारख्या ठिकाणी देखील बाल कामगार डोक्यावरून वीट वाहताना दिसतात. बाल कामगार अधिनियमांला सर्रास पायदळी तुडविण्यात येत असते. 


सोलापूर जिल्ह्यातील सहायक कामगार आयुक्त कार्यालयाने मात्र आता आंतरराष्ट्रीय बालकामगार विरोधी दिनाच्या निमित्ताने कारवाईचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील उत्पादन करणाऱ्या कंपन्या, विडी उत्पादक, यंत्रमाग उत्पादक कारखाने हॉटेल, गॅरेज अशा कुठल्याही ठिकाणी बाल कामगार ठेवले जाऊ नयेत, बालकामगार ठेवले असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापनावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बाल कामगार व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम १९८६ नुसार कामावर बाल कामगारांना ठेवणे हा गुन्हा असून अशा गुन्हा करणाऱ्यास दोन वर्षांपर्यंत सक्तमजुरीच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.  


नागरिकांना आवाहन 

धोकादायक उद्योग व्यवसायात बाळ कामगार असल्याची माहिती असल्यास किंवा तसे आढळले असल्यास नागरिकांनी सहायक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाशी संपर्क करून तक्रार करावी असते आवाहन आयुक्त कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !