BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ एप्रि, २०२२

अजान सुरु असतानाच पोलिस अधिकाऱ्यानेच वाजवला भोंगा !

 




भोंग्यावरून राज्यातील राजकारण गरमागरम असताना मशिदीत नमाज पठण सुरु असताना एका पोलीस अधिकाऱ्यानेच भोंग्यावरून गाणे वाजविल्याने सदर पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


मशिदीवरील भोंगे खाली उतरविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. तोपर्यंत भोंगे उतरवले नाहीत तर मशिदीच्या समोर भोंगे लावून हनुमान चालीसा वाजविली जाईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. त्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून धार्मिक तेढ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विनापरवाना भोंगे न लावण्याबाबत शासनाने देखील निर्णय घेतला आहे. हनुमान चालीसाच्या विषयावरून राज्यात गदारोळ उडाला आहे आणि अशा नाजूक परिस्थितीत एका पोलीस अधिकाऱ्याने मशिदीत नमाज सुरु असताना भोंग्यावरून गाणे वाजविल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. 


किशोर गदाप्पा मलकूनाईक या औरंगाबादच्या रेल्वे पोलीस उपनिरीक्षकाच्या घराच्या मागच्या बाजूलाच मशीद आहे, या मशीदीत नमाज पठण सुरु होते. नेमक्या याच वेळेस या अधिकाऱ्याने मशिदीच्या दिशेने मोठ्या आवाजात लाऊडस्पीकरवरून गाणे लावले. सद्याच्या तापलेल्या वातावरणात आणि एका पोलीस अधिकाऱ्यानेच हा प्रकार केल्याने खळबळ उडणे स्वाभाविक आहे. या कृतीने धार्मिक तेढ निर्माज होऊ शकते त्यामुळे सदर पोलीस उप निरीक्षकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !