BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ एप्रि, २०२२

लग्नपत्रिकेत डिग्री छापली नाही म्हणून मोडले लग्न !




लग्नपत्रिकेत वधूपक्षाने आपली डिग्री छापली नाही म्हणून ऐनवेळी डॉक्टर असलेल्या एका तरुणाने लग्न मोडले आणि नवरीने मात्र या अपमानामुळे आत्महत्या करून आपले जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.


लग्न म्हणजे पवित्र बंधन असते पण काहींच्या दृष्टीने या लग्नालाही व्यापारी स्वरूप दिले जाते.  हुंड्यासाठी आणि देण्याघेण्याच्या कारणावरून भर मंडपात देखील विवाह मोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कायद्याने हुंड्याला बंदी असली तरी त्याशिवाय लग्न होताना दिसत नाहीत आणि त्यासाठीच ठरलेली लग्न देखील विस्कटून जातात. अशिक्षित कुटुंबात तर या घटना घडतातच पण सुशिक्षित आणि उच्चशिक्षित म्हणविणारे देखील ऐनवेळी अडून बसतात. आपल्या पदवीचा अवास्तव गर्व असलेल्या पालघरच्या एका डॉक्टरने केवळ नवरीकडील लग्नपत्रिकेत आपल्या नावापुढे डिग्री छापली नाही एवढ्या किरकोळ कारणावरून ऐनवेळी लग्नच मोडले आणि त्याच्या या हेकेखोरीमुळे आणखीच गोंधळ निर्माण झाला. 


आपली डिग्री मिरविण्याची काहीना भलतीच हौस असते. आपल्या नावापुढे प्रत्येक वेळी डिग्री लिहावी असा त्यांचा अट्टाहास असतो. डॉक्टर जिनीतकुमार गावड याचा विवाह सिव्हील इंजिनियर असलेल्या आणि वसई येथे नोकरी करीत असलेल्या तरुणीशी निश्चित झाला होता.. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा परिचय झाला आणि पुढे त्याचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यातूनच त्यांचा विवाह ठरला आणि तो आज एक रिसोर्टमध्ये होणार होता. परंपरेप्रमाणे नवरीचे आईवडील डॉक्टर गावड याच्या वडिलांना लग्नाची पत्रिका द्यायला गेले. लग्नाच्या पत्रिकेवर वधूची पदवी छापली होती पण  वरची शैक्षणिक पात्रता छापली गेली नव्हती. 


लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर नवरीची शैक्षणिक पात्रता छापण्यात आली आणि आपली मात्र छापली नाही याचा होणाऱ्या नवरोबाला राग आला आणि यातूनच त्याने ऐन लग्नाच्या वेळी लग्नाला नकार दिला. यामुळे प्रचंड गोंधळ उडाला. निमंत्रण पत्रिका वाटून झाल्यानंतर अगदी लग्नाच्या ऐनवेळी वराने लग्नाला नकार दिल्याने वधू ला मोठा धक्का बसला. झालेल्या अपमानामुळे वधूने फिनाईल प्राशन करून आपल्या जीवनाचा शेवट करण्याचा प्रयत्न केला. (The degree was not printed in the invitation card, the marriage broke up) वेळीच हा प्रकार लक्षात आला आणि तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


नवरदेव झाला बेपत्ता !
या घटनेनंतर डॉ. जीनितकुमार गावड आणि त्याचे आईवडील बेपत्ता झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या तिघांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिग्री न छापल्यामुळे लग्न मोडणार्या डॉक्टरने सदर तरुणीस डहाणू येथील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला होता. त्याच्या आई वडिलांनीही तिच्यावर अत्याचार केल्याची फिर्याद पोलिसात देण्यात आली आहे. बलात्कार, फसवणूक, दुखापत करणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे अशा कलमानुसार या तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !