BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२६ मार्च, २०२२

दुचाकी चाकाखाली, एस टी ला लागली आग !



औरंगाबाद : धावत्या एस टी च्या टायरखाली दुचाकी आली आणि राज्य परिवहन महामंडळाच्या बसने  पेट घेतल्याची अत्यंत थरारक घटना (Burning Bus) घडली पण सुदैवाने प्रवासी मात्र बचावले आहेत.


उन्हाळा सुरु झाला आणि रस्त्यावरील धावती वाहने जळण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. उन्हाळ्याच्या कडक उन्हाळा अजून सुरु झाला नाही  आणि आग लागावी असे तापमान देखील अजून वाढलेले नाही पण रोज कुठे ना कुठे धावत्या गाड्या पेटू लागल्या आहेत. चार चाकी वाहने तर पेटत आहेतच पण काही दिवसापूर्वी चाळीस प्रवासी घेऊन निघालेल्या शिवशाही बसला आग लागली आणि संपूर्ण बस जळून खाक झाली.  आता पुन्हा राज्य परिवहन महामंडळाची एस टी पेटली परंतु ती उन्हामुळे नाही तर एका अपघातामुळे बसला आग लागली. ( Running ST bus caught fire) अपघात झाल्यानंर काही क्षणात एस टी ला आग लागली आणि तिने रौद्र स्वरूप धारण केले



वैजापूर - कन्नड ही वैजापूर आगारातील एस टी रोटेगाव रेल्वे स्टेशनाच्या उड्डाण पुलावर आली त्यावेळी एका दुचाकीला धडकली. धडक झाल्यानंतर दुचाकी बसच्या पुढच्या चाकाखाली गेली आणि तशीच काही अंतर फरफटत गेली. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून चालकाने बस रस्याच्या कडेला घेतली आणि बसमधील प्रवाशांना तातडीने खाली उतरविण्यात आले.  दुचाकीचा पेट्रोल टाकीला या अपघातात जोरदार मार लागल्याने पेट्रोल टाकी फुटून स्फोट झाला आणि त्यातून आग लागली. काही क्षणात संपूर्ण बसचा ताबा आगीने घेतला आणि भयानक अग्नितांडव सुरु झाले. .


या बसमध्ये सतरा प्रवाशी होते आणि बसला लागलेल्या आगीने त्यांच्या अंगावर काटे उभे राहिले होते. वैजापूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर हे अग्नितांडव सुरु झाले होते त्यामुळे अग्निशामक दल तातडीने दाखल होऊ शकले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. (Running s. t. bus caught fire after accident)बसचे चालक वाहक सुखरूप आहेत परंतु दुचाकीचालक मात्र गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !