मुंबई : प्रधानमंत्री किसान योजनेत इ केवायसी (e KYC) साठीची मुदत वाढविण्यात आली असून यामुळे आता शेतकरी बांधवाना पुरेसा वेळ मिळणार आहे.
प्रधानमंत्री किसान योजना (PM Kisan Yojana) ही गरजू शेतकरी बांधवासाठी सुरु करण्यात आली परंतु अनेक अपात्र लोकांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे शासनाच्या निदर्शनास आले त्यामुळे या योजनेच्या नियमात अनेक बदल करण्यात आले. सातत्याने या योजनेत बदल होत असून अनियमितता टाळली जावी आणि खऱ्या गरजूना लाभ मिळावा यासाठी शासनाचा हा सतत प्रयत्न आहे. वारंवार होत असलेल्या बदलामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची अडचण देखील होत आहे परंतु गैरप्रकार रोखण्यासाठी शासनाला हे पाउल उचलावे लागले आहे.
पी एम किसान योजनेतील दहावा हप्ता १ जानेवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता पण अकराव्या हप्त्यासाठी इ केवायसी बंधनकारक करण्यात आली होती. इ केवायसी केल्याशिवाय अकरावा हपा जमा होणार नाही असे स्पष्ट करण्यात आले होते. यासाठी ३१ मार्च २०२२ ही अंतिम मुदत देण्यात आली होती. इ केवायसी करताना स्थानिक पातळीवर अनेक अडचणी येऊ लागल्याने शेतकऱ्यांची कोंडी होत होती आणि अनेकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नव्हती. शेतकऱ्यास पुरेसा वेळ मिळावा यासाठी ही मुदत दोन महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. आता ३१ मे पर्यत इ केवायसी करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.
अपात्र व्यक्तींनी घेतला लाभ !
पी एम किसान योजनेंतर्गत वर्षाकाठी ६ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात आणि आता अकरावा हप्ता जमा केला जाणार आहे . किसान योजनेचे हे सहावे वर्ष असून या काळात अनेक अपात्र व्यक्तींनी योजनेचा फायदा घेतला आहे. शासकीय कर्मचारी, आयकर दाते यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही तरी देखील अशा लाखी व्यक्तींनी या योजनेचा फायदा उठवला. (Pradhanmantri Kisan Yojana KYC deadline extension) हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्यांच्याकडून आता वसुली देखील करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
अशी करा e-Kyc
ई - केवायसी करण्यासाठी pmkisan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन जेथे e-kyc असे लिहिलेले दिसेल त्यावर क्लिक करावे. आपला आधार क्रमांक टाकून सर्च करावे. आधार प्रमाणीकरण करण्यासाठी बटनावर क्लिक करावे. त्यानंतर नोंदणी केलेल्या मोबाईलवर एक OTP येइल. सहा अंकी हा ओटीपी भरून सबमिट बटनावर क्लिक केल्यास प्रक्रिया पूर्ण होईल.
हे देखील वाचा :
अधिक बातम्यासाठी येथे क्लिक करा .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !