पंढरपूर : तरुण तरुणींच्या आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे चिंता व्यक्त होत असतानाच पंढरपूर शहरात पुन्हा एकदा एका तरुणीने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
पंढरीत गेल्या काही महिन्यात आत्महत्या होण्याच्या घटना घडलेल्या आहेत. कधी सावकारीच्या जाचातून तर कधी नैराश्यातून आत्महत्या होण्याच्या घटना समोर येताना दिसत आहेत. अनेकदा अत्यंत किरकोळ कारणामुळे देखील आत्महत्या होत असून या आत्महत्या तरुण वयातील आहेत हे लक्षणीय आहे. जीवन अनमोल आहे असे म्हटले जात असले तरी जीवन खऱ्या अर्थाने सुरु होण्याच्या आधीच अशा दुर्दैवी घटना घडता दिसतात. पंढरपूर शहरात आणखी एका तरुणीने आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे.
उमदे गल्लीतील अवघ्या २० वर्षीय वैष्णवी आनंद पाठक या तरुणीने आपल्या राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वैष्णवी ही एमएससी चे शिक्षण घेत होती. तिने राहत्या घरातच साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तिने गळफास घेतल्यानंतर काही वेळेतच ही घटना निदर्शनास आली. तिला तातडीने उप जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले पण तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. सदर घटनेची शहर पोलिसात नोंद करण्यात आली असून परिसरात मात्र या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
वाचा >>
पंढरीत पोलिसावर तलवार हल्ला : चौघांना पोलीस कोठडी !
पंढरपूर शहरात तरुणीने घेतला गळफास !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !