BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ फेब्रु, २०२२

मुलीला एकदा 'आय लव्ह यू' म्हणणे गुन्हा नाही !

 



मुंबई : मुलीला एकदा 'आय लव्ह यू' म्हणणे म्हणजे मुलीचा अपमान नसून ती एक प्रेमाची अभिव्यक्ती आहे असे सांगत विशेष न्यायालयाने एका तरुणाला निर्दोष मुक्त केले आहे. 


रस्त्यावर अथवा शाळा महाविद्यालयाच्या परिसरात अनेक सडकसख्याहरी उभे असतात आणि ते मुलीना उद्देशून काही न काही बोलत असतात. विविध प्रकारे मुलींची छेड काढून त्यांना त्रास देखील देत असतात. काही शब्दांचा उच्चार देखील केले जातात. मुलीनी जर पोलिसात तक्रार केली तर त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा देखील दाखल होतो.  पण मुंबईच्या विशेष न्यायालयाने अशा एका तरुणाची निर्दोष मुक्तता केली आहे. २३ वर्षे वयाच्या एका तरुणावर पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.  


या तरुणाने २०१६ मध्ये आपल्या घराजवळ राहणाऱ्या एका १७ वर्षे वयाच्या मुलीस 'आय लव्ह यु' असे म्हटले होते. पोलिसात देण्यात आलेल्या फिर्यादनुसार सदर तरुणाने मुलीकडे रोखून पाहिले आणि तिच्या डोळ्यावर वार केले, तिच्या आईला देखील धमकावले होते. या फिर्यादीनुसार वडाळा टी टी पोलिसांनी तरुणावर पॉस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी होऊन विशेष न्यायाधीश कल्पना पाटील यांनी या तरुणाची निर्दोष मुक्तता केली आहे आणि यावेळी एक टिपणी देखील केली आहे. 'आय लव्ह यू' म्हणणे म्हणजे पीडितेवर प्रेम व्यक्त करण्यासारखे आहे, पीडितेच्या नम्रतेचा अपमान करण्याच्या उद्देशाने हे करण्यात आले आहे असे मानता येणार नाही. शिवाय आरोपीने वारंवार पीडितेचा पाठलाग करून 'आय लव्ह यू' म्हटले असल्याचेही या प्रकरणात नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. 


पीडित अल्पवयीन मुलीने सांगितलेले आणि तिच्या आईने सांगितलेले घटनास्थळ वेगळे आहे. आईने 'घराजवळील बाथरूममध्ये हा प्रकार घडला होता' असे सांगितले तर पीडित मुलीने दुसऱ्या बाथरूममध्ये ही घटना घडली असल्याचे सांगितले आहे. दोघांचे नेमके पुरावे देखील अस्पष्ट असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयांने या प्रकरणात सदर तरुणाची निर्दोष मुक्तता देखील केली आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !